रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन जोडीच्या सुपर हिट शोच्या जोरावर मुंबई इंडियन्सच्या संघाने लखनौ सुपर जाएंट्सने दिलेल्या विक्रमी धावांचा यशस्वी पाठलाग करत नवा इतिहास रचला आहे. पूरनच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर लखनौच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २२८ धावा करत मुंबई इंडियन्ससमोर २२९ धावांचे टार्गेट सेट केले होते. आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात मुंबई इंडियन्सच्या संघाने एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग कधीच केला नव्हता.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पराभवाचा LSG ला मोठा धक्का, MI सारखीच झाली अवस्था
दुखापतीमुळे पाच सामन्याला मुकलेल्या हिटमॅन रोहित शर्माच दमदार कमबॅक आणि रायन रिकल्टनने कामगिरीतील सातत्य दाखवून देत मुंबई इंडियन्सने आयपीएल इतिहासातील आपल्या सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग अगदी सहज साध्य केला. दुसरीकडे या सामन्यातील पराभवासह मुंबई इंडियन्सपाठोपाठ आता लखनौच्या संघाचीही स्वबळावर प्लेऑफ्स तिकीट मिळवण्याची आशा संपुष्टात आली आहे. दोन्ही संघ गुणतालिकेत तळाला असून उर्वरित सर्व सामने जिंकले तरी मुंबई इंडियन्स आणि लखनौ दोन्ही संघ १४ गुणांपर्यंतच पोहचू शकतात.
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
निकोलस पूरनचे वादळी अर्धशतक अन्...
निकोलस पूरनच्या २१ चेंडूतील ६३ धावांच्या धमाकेदार खेळीशिवाय मिचेल मार्श ४४ (२५), एडन मार्करम ३१ (२५) आणि हिम्मत सिंग ४० (३१) यांनी दिलेल्या योगदानाच्या जोरावर लखनौच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ५ विकेट्सच्या मोबदल्यात २२८ धावा केल्या होत्या. मुंबई इडियन्सकडून क़र्बिन बॉशनं सर्वाधिक २ तर अल्लाह गझनफर, विल जॅक्स आणि रघु शर्मा यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतली.
Web Summary : Rohit Sharma and Ryan Rickelton powered Mumbai Indians to a record-breaking victory, chasing down Lucknow's 228. Pooran's fifty propelled Lucknow, but Mumbai's strong batting performance secured the win, jeopardizing Lucknow's playoff chances.
Web Summary : रोहित शर्मा और रयान रिकेल्टन की शानदार बल्लेबाजी से मुंबई इंडियंस ने लखनऊ के 228 रनों के लक्ष्य को हासिल कर रिकॉर्ड जीत दर्ज की। पूरन के अर्धशतक ने लखनऊ को आगे बढ़ाया, लेकिन मुंबई की बल्लेबाजी ने लखनऊ की प्लेऑफ की उम्मीदों को खतरे में डाल दिया।