मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दमदार पुनरागमन करत विक्रमी विजयाची नोंद केली. या विजयात रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन यांच्या शानदार खेळींसोबतच ३३ व्या वर्षी पदार्पण करणारा लेग स्पिनर रघु शर्मा लक्षवेधी ठरला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
IPL मधील पहिली विकेट अन् खास सेलिब्रेशन
यंदाच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात पदार्पण करणाऱ्या या अनुभवी गोलंदाजाने दुसऱ्या सामन्यात IPL मधील पहिली विकेट आपल्या खात्यात जमा केली. लखनौ विरुद्धच्या सामन्यात मिळवलेली ही विकेट म्हणजे १५ वर्षांची त्याची तपस्या होती. त्यामुळेच त्याने भावूक होत खास नोट्स दाखवून या विकेट्सचा आनंद व्यक्त केला. मैदानातील त्याची ही कृती सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
त्या नोट्समध्ये नेमकं काय लिहिलं होतं?
पहिल्या विकेटचा आनंद व्यक्त करताना रघुनं आपल्या खिशातून एक चिठ्ठी काढली, ज्यावर एक भावनिक संदेश लिहिलेला होता. "गुरुदेवांच्या कृपेने माझ्या १५ वर्षांच्या अत्यंत वेदनादायक संघर्ष अखेर संपला. मला ही संधी दिल्याबद्दल मुंबई इंडियन्सचे मनःपूर्वक आभार. मी सदैव ऋणी राहीन. जय श्री राम," असे त्या चिठ्ठीत लिहिले होते.
वयाच्या ३३ व्या वर्षी पदार्पणाची संधी अन्...
क्रिकेटर्सच्या रुपात अल्प संधी मिळाल्यावर स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट आणि स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग ट्रेनरच्या रुपात ओळख निर्माण करून क्रिकेटशी कनेक्ट राहण्याचा ध्यास जपणाऱ्या लेग स्पिनर रघु शर्माला मुंबई इंडियन्सने वयाच्या ३३ व्या वर्षी चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात पदार्पणाची संधी दिली. या सामन्यात ४ षटकात २४ धावा खर्च करत आपल्या गोलंदाजीतील धमक दाखवणाऱ्या रघुनं लखनौ विरुद्धच्या सामन्यात ४ षटकांत ३६ धावा खर्च करत पहिली आयपीएल विकेट आपल्या खात्यात जमा केली. १३ व्या षटकात रघुनं लखनौच्या ताफ्यातून पदार्पण करताना षटकारासह खाते उघडणाऱ्या अक्षत रघुवंशीला बाद केले.
मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय
या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना निकोलस पूरनच्या २१ चेंडूतील ६३ धावांच्या वादळी खेळीच्या जोरावर लखनौच्या संघाने निर्धारित २० षटकात ५ बाद २२८ धावा केल्या होत्या. मुंबई इंडियन्सच्या संघाने रोहित आणि रिकल्टनच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करताना ६ विकेट्स आणि ८ चेंडू राखून सामना खिशात घातला.
Web Summary : Raghu Sharma, a 33-year-old leg spinner, made a remarkable IPL debut for Mumbai Indians. After 15 years of struggle, his emotional 'note celebration' after taking his first wicket went viral as MI secured a record-breaking win against LSG.
Web Summary : 33 वर्षीय लेग स्पिनर रघु शर्मा ने मुंबई इंडियंस के लिए शानदार आईपीएल डेब्यू किया। 15 साल के संघर्ष के बाद, अपना पहला विकेट लेने के बाद उनका भावुक 'नोट सेलिब्रेशन' वायरल हो गया क्योंकि एमआई ने एलएसजी के खिलाफ रिकॉर्ड तोड़ जीत हासिल की।