शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

खेड तालुक्यातील कळमोडी धरण यंदा महिनाभर अगोदरच १०० टक्के भरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 10:24 IST

खेड तालुक्यातील आठ टीएमसी क्षमतेच्या चासकमान धरणात आजमितीला ३५ टक्के पाणीसाठा झाला असून, गतवर्षी ७.०८ टक्के पाणीसाठा धरणात शिल्लक होता

राजगुरूनगर : खेड तालुक्यातील चासकमान धरणाअतंर्गत आरळा नदीवरील दीड टीएमसी क्षमतेचे कळमोडी धरण तब्बल महिनाभर अगोदरच १०० टक्के भरून सांडव्यावरून मंगळवार, दि. २४ जून रोजी सायंकाळी ६:१५ वाजता पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. आरळा नदीकाठच्या ग्रामस्थांनी सावध राहण्याचे आवाहन चासकमान पाटबंधारे विभागाने केले आहे.

यंदा अवकाळी पावसाने १० मेपासून खेड तालुक्याला चांगलेच झोडपून काढल्याने उन्हाळी बाजरी पिकासह, आंबे, भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले तर पश्चिम भागातील भात उत्पादक क्षेत्रात भात रोपे तयार करण्यासाठी रान भाजणीची कामे खोळंबली गेली. शेतजमिनीत पाणी साठल्याने खरीप हंगामातील पेरणीच्या कामासह बटाटा लागवडी खोळंबून बटाटा बियाणे सडण्याच्या मार्गावर आल्याने अगोदरच उन्हाळी पिके नेस्तनाबूत होऊन आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर आता खरीप हंगामातील पेरण्यांच्या कामावर संक्रांत आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

संपूर्ण मे महिन्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असताना २६ मेला मान्सूनचे आगमन दमदार झाल्याने पावसाने उघडीप न दिल्याचा परिणाम शेती क्षेत्रावर झाला. दुसरीकडे उन्हाळ्यातील तीव्र पाणीटंचाईच्या समस्या सुटून मे महिन्यातच शासकीय टँकर बंद झाले, तर तालुक्यातील बंधारे, विहिरी, पाझर तलाव भरले तर ओढे, नाले, धबधबे दुथडी भरून गेल्याने नद्यांना पूर येऊन गेले. तालुक्यातील तीन धरणांतील पाणीसाठा तळाला गेला असताना धरणात पाण्याचा येवा वाढल्यामुळे पाणीटंचाईचे जलसंकट निवारण मे महिन्यातच होऊ लागल्याचे पाहावयास मिळाले.   खेड तालुक्यातील आठ टीएमसी क्षमतेच्या चासकमान धरणात आजमितीला ३५ टक्के पाणीसाठा झाला असून, गतवर्षी ७.०८ टक्के पाणीसाठा धरणात शिल्लक होता. धरणक्षेत्रात आतापर्यंत २७१ मिमी एकूण पर्जन्य पडल्याची नोंद झाली. ८.१४ टीएमसी क्षमतेच्या भामाआसखेड धरणात आजमितीला ३१.६८ टक्के पाणीसाठा झाला असून, गतवर्षी १४.५८ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. धरण क्षेत्रावर १८६ मिमी एकूण पावसाची नोंद झाली.

टॅग्स :PuneपुणेKhedखेडDamधरणWaterपाणीRainपाऊसweatherहवामान अंदाज