शहरं
Join us  
Trending Stories
1
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
2
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
3
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
4
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
5
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
6
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
7
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
8
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
9
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
10
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
11
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
13
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
14
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
15
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
16
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
17
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
18
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
19
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
20
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
Daily Top 2Weekly Top 5

'इथे कधीच होणार नाही', तीर्थक्षेत्र आळंदीलगतचे कत्तलखाना आरक्षण रद्द करू - उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 11:13 IST

तपोवन आश्रम असणाऱ्या पवित्र स्थळी कत्तलखाना उभारण्याचा निर्णय म्हणजे हिंदू धर्म, अध्यात्म व परंपरेवर थेट हल्ला असल्याचा आरोप केला जात आहे

आळंदी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत जे आरक्षण आहे, ते आम्ही रद्द करू. कत्तलखाना इथे कधीच होणार नाही असा शब्द उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिला. तीर्थक्षेत्र आळंदीत ह.भ.प.प्रमोद महाराज जगताप यांच्या षष्ठ्यब्दीपूर्ती कृतज्ञता सोहळा आणि गौरवग्रंथ प्रकाशन सोहळा उद्योग मंत्री उदय सामंत हस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. 

मराठी भाषेचा मंत्री झाल्यापासून सहा महिन्यांत तीनदा आळंदीला आलो आहे. ज्ञानेश्वरी ही सर्वसामान्यांच्या हातात पोहोचली पाहिजे, अशी लोकांची मागणी होती. त्यानुसार, पुढच्या आठ तासांत ज्ञानेश्वरीची छपाई करण्याचा निर्णय घेतल्याचं मी नमूद केलं. इतर क्षेत्रांप्रमाणेच वारकरी पंथातही पद्म पुरस्कार दिला पाहिजे, असं मत व्यक्त करत लवकरच गुरुवर्य शांतीब्रह्म मारोतीबाबा महाराज कुरेकर यांना 'पद्म पुरस्कार' मिळण्याची शिफारस करणार असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.

तीर्थक्षेत्र आळंदी लगत असणाऱ्या मोशी - डुडुळगाव परिसरात पिंपरी - चिंचवड महापालिकेने चार एकर जागेवर कत्तलखाना उभारण्यासाठी जागा आरक्षित केली आहे. या धक्कादायक निर्णयामुळे संपूर्ण हिंदू समाज, विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि लोकप्रतिनिधींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे या परिसरात राम मंदिर अयोध्याचे कोषाध्यक्ष पूज्य गोविंददेव गिरी महाराज यांचा वेदव्यास 'तपोवन' आश्रम असून हजारो विद्यार्थी त्याठिकाणी वेदिक शिक्षण घेत आहेत. अशा पवित्र स्थळी कत्तलखाना उभारण्याचा निर्णय म्हणजे हिंदू धर्म, अध्यात्म व परंपरेवर थेट हल्ला असल्याचा आरोप केला जात आहे. 

टॅग्स :PuneपुणेAlandiआळंदीUday Samantउदय सामंतShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणHinduहिंदूTempleमंदिर