बैलगाडा शर्यतीत जोरदार धडक; तरुणाचा मृत्यू, शिरूर तालुक्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 17:24 IST2026-04-30T17:21:28+5:302026-04-30T17:24:01+5:30

बैलगाडा शर्यत सुरु असताना बैलगाडा पळाल्यानंतर सदर बैले धरण्यासाठी तरुण गेला असता त्याला बैलाची जोरात धडक बसून जमिनीवर पडला

Heavy collision during bullock cart race; Youth dies, shocking incident in Shirur taluka | बैलगाडा शर्यतीत जोरदार धडक; तरुणाचा मृत्यू, शिरूर तालुक्यातील धक्कादायक घटना

बैलगाडा शर्यतीत जोरदार धडक; तरुणाचा मृत्यू, शिरूर तालुक्यातील धक्कादायक घटना

शिक्रापूर : करंदी (ता. शिरुर) येथे बैलगाडा शर्यतीच्या घाटामध्ये बैल पकडायला गेलेल्या इसमाचा बैलाची धडक बसून मृत्यू झाला असून प्रकाश महादू फटांगडे (वय ३५ रा. कान्हूर मेसाई ता. शिरूर जि. पुणे) असे मृताचे नाव आहे.

करंदी येथे आयोजित करंदी केसरी २०२६ या बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. दरम्यान बैलगाडा शर्यत सुरु असताना कान्हूर मेसाई येथील दादाभाऊ पुंडे यांचा बैलगाडा पळाल्यानंतर सदर बैले धरण्यासाठी प्रकाश फटांगडे हा गेला असता त्याला बैलाची जोरात धडक बसून प्रकाश जमिनीवर पडला. दरम्यान नागरिकांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी प्रकाश फटांगडे याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. याबाबत गोरक्ष महादू फटांगडे (रा. कान्हूर मेसाई) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिल्याने पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलिस हवालदार नरेद्र गायकवाड हे करत आहे.

Web Title : बैलगाड़ी दौड़ में हादसा: सांड की टक्कर से युवक की मौत

Web Summary : शिरूर के करंदी में बैलगाड़ी दौड़ के दौरान एक युवक की मौत हो गई। 35 वर्षीय प्रकाश फटांगडे को बैल पकड़ने की कोशिश करते समय एक सांड ने टक्कर मार दी। अस्पताल में उन्हें मृत घोषित कर दिया गया। पुलिस जांच कर रही है।

Web Title : Bullock cart race tragedy: Youth dies after being hit by bull.

Web Summary : A man died in Karandi, Shirur, during a bullock cart race. Prakash Phatangade, 35, was struck by a bull while trying to catch it. He was rushed to the hospital but declared dead. Police are investigating.