शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

व्यापारी वर्गाकडून शेतकऱ्यांची लूट ; लॉकडाऊनच्या परिस्थितीचा उचलला जातोय फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2020 16:26 IST

आठवडे बाजार, विविध कृषि उत्पन्न बाजार समिती बंद असल्याने लिलाव बंद

ठळक मुद्देनफेखोरी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची शेतकरी संघटनेची मागणी 

बारामती : कोरोनामुळे आणीबाणीच्या परिस्थितीचा फायदा उचलत व्यापारीवर्गाने कवडीमोल किमतीत शेतमाल खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. बाजार समित्या बंद असल्याने तयार झालेला शेतमाल मिळेल त्या किमतीत विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ओल्या दुष्काळानंतर आलेल्या या मोठ्या संकटामुळे त्यांचे अर्थकारण पूर्णपणे कोलमडून गेले आहे. तर व्यापारी व दलाल वर्ग यापरिस्थितीत प्रचंड नफेखोरी करत असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शेतकरी संघटनांच्या माध्यमातून केली जात आहे. कोरोना साथीच्या पार्शवभूमीवर केंद्र सरकारने 22 मार्चपासून 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. याचा परिणाम शेतमालावर देखील मोठ्या प्रमाणात झाला आहे. शेतमाल वाहतुकीची परवानगी जरी देण्यात आली असली तरी आठवडे बाजार, विविध कृषि उत्पन्न बाजार समिती बंद असल्याने लिलाव बंद आहेत.  त्यामुळे मोठया प्रमाणातील शेतमाल विक्रीचे संकट शेतकऱ्यांसमोर आहे.  नेमक्या याच संकटाचा फायदा उठवत व्यापारी वर्ग साखळी करून शेतमालाचे दर पाडू लागला आहे. केळी,  द्राक्ष,  तसेच काहीप्रमाणात डाळिंबाचे पीक शेतात काढणीला आले आहे.  वाढत्या उष्णतेमुळे 'सनबर्निंग' चा धोका वाढतो. या फळबागा परिस्थिती निवळेपर्यंत शेतकरी ठेवू शकत नाही. मागील 20 दिवसांपूर्वी 8 ते 10 रुपये किलो असणारा केळीचा दर अवघ्या 4 रुपयांवर आला आहे. मात्र हीच केळी विक्रेते ग्राहकांना 60 ते 70 रुपये डझनने विकत असल्याचेही चित्र आहे. तर 90 ते 100 रुपये किलो असणारा निर्यातक्षम द्राक्षमाल 30 रुपये प्रतिकिलोने विकावा लागत आहे. अशीच परिस्थिती तरकारी पिकांची झाली असून मातीमोल किमतीत फळभाज्यांची विक्री शेतकऱ्यांना करावी लागत आहे. मात्र यामध्ये व्यापारी,  दलाल,  स्थानिक विक्रेत्याचे उखळ पांढरे होऊ लागले आहे.  

.......................

नफेखोरी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करा : पांडुरंग रायते शासनाचे सर्व लक्ष सध्या साथरोग निवारणाकडे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी लूट व्यापारी वर्गाकडून सुरु आहे. या संकटाचा परिणाम शेती व्यवसायावर दीर्घकालीन स्वरूपात होणार आहे. नफेखोरी टाळण्यासाठी शेतमालाला जीवनावश्यक वस्तू कायद्यातून वगळले पाहिजे.  त्यामुळे शेतकऱ्यांना स्वत:च्या मालाची किंमत ठरवता येईल.  सध्याच्या परिस्थितीत नफेखोरी करणाऱ्या व्यापारी व विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग रायते यांनी केली.  

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांसोबत गुरुवार (दि. 2) व शुक्रवारी (दि.3) बैठकीसाठी बोलावले आहे. शनिवारपासून बाजार समितीत शेतमालाचे लिलाव सुरू करण्यासंदर्भात यावेळी चर्चा करणार आहोत. - अरविंद जगताप,सचिव कृषि उत्पन्न बाजार समिती, बारामती. 

टॅग्स :BaramatiबारामतीFarmerशेतकरीMarketबाजारvegetableभाज्याfruitsफळेbusinessव्यवसाय