शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

भारतात लठ्ठ श्वानावर पहिलीच शस्त्रक्रिया! वजनात तब्बल पाच किलोनं झाली घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 13:23 IST

लॅपरोस्कोपिक स्लीव्ह गॅस्ट्रोनोमी’ सर्जरी, अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी केली शस्त्रक्रिया

ठळक मुद्दे६ जूनला श्वानावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. श्वानाला भूल देऊन ही शस्त्रक्रिया करण्यात आली. साधारणतः दोन तास शस्त्रक्रिया चालली

पुणे: वजन कमी करण्यासाठी अनेक जण शस्त्रक्रियेचा पर्य़ाय निवडतात, हे सर्वांनाच माहिती आहे. परंतु, एका श्वानावर (कुत्री) वजन कमी करण्यासाठी ‘ लॅपरोस्कोपिक स्लीव्ह गॅस्ट्रोनोमी’ शस्त्रक्रिया करण्यात आली. लठ्ठपणा कमी करण्यासाठी कुत्र्यावर शस्त्रक्रिया होण्याची ही पहिलीच घटना आहे. हे ऐकल्यावर नक्कीच आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे. लठ्ठपणा हा आजार असून माणसांप्रमाणे कुत्र्यांमध्येही लठ्ठपणा वाढतोय. पुण्यात अशाच एका ५० किलो वजन असलेल्या एका कुत्र्यांवर वजन कमी करण्यासाठी ही करण्यात आली आहे. यानंतर आठवड्याभरात श्वानाच्या वजनात तब्बल पाच किलोनं घट झाली आहे. त्यामुळे आता श्वानाचे वजन ४५ किलो इतके झाले आहे.

पुण्यातील कर्वेनगर येथील रहिवासी दारूवाला यांनी हा दिपीका नावाची कुत्री पाळली आहे. पाच वर्षांपूर्वी दिपिका घरी आल्यानंतर घरात आनंदाचे वातावरण होते. सुरूवातीला ती घराच्या आसपास धावत राहायची, घरातील कामामध्येही मदत करत होती. कुटुंबातील इतर सदस्यांच्या सूचनेचेही पालन करत होती. परंतु, त्यानंतर तिला श्वास घेताना अडचण जाणवू लागली. श्वास घेता येत नसल्याने ती एकाच जागी बसून रहायची. हे लक्षात आल्यानंतर त्यांनी औषधोपचार सुरू केले. दरमहा १० हजार रूपये औषधांसाठी खर्च करण्यात येत होता. परंतु, तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यानंतर सोशल मिडियावरून माहिती काढून कुटुंबियांनी पुणे येथील स्मॉल अ‍ॅनिमल क्लिनिकचे डॉ. नरेंद्र परदेशी यांची भेट घेतली. अतिरक्त वजन कमी करण्यासाठी आहारात बदल करून लेप्रोस्कोपिक स्लीव्ह गॅस्ट्रोनोमी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानंतर डॉ. शशांक शहा यांच्याशी चर्चा करून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. या शस्त्रक्रियेमुळे श्वानाचं आयुष्यच बदलून गेलं आहे.

‘‘६ जूनला श्वानावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. श्वानाला भूल देऊन ही शस्त्रक्रिया करण्यात आली. साधारणतः दोन तास ही चालली. शस्त्रक्रियेपूर्वी १२ तास श्वानाला द्रव आहाराशिवाय काहीही खायला दिले नव्हते. साधारणतः प्रत्येक श्वानाचे वजन १८-२० किलो इतके असले पाहिजे. परंतु, या श्वानाचे वजन तब्बल ५० किलो एवढे होते. शस्त्रक्रियेनंतर श्वानाला सात दिवस चिकन सूपवर देण्यात येत होते. त्यानंतर अवघ्या पाच दिवसात श्वानाच्या वजनात पाच किलो घट झाली आहे. आता श्वानाचे वजन ४५ किलो आहे. सध्या श्वानाला व्यायामाचा सल्ला देण्यात आला आहे’’, असेही डॉ.  परदेशी म्हणाले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडdocterडॉक्टरHealthआरोग्यdogकुत्राhospitalहॉस्पिटल