शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
3
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
4
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
5
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
6
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
7
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
8
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
9
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
10
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
11
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
12
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
13
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
14
पूर्वेकडचे लोक चिनी, दक्षिणेतील आफ्रिकींसारखे; सॅम पित्रोदा यांचे वादग्रस्त उद्गार; काँग्रेसने घेतला राजीनामा
15
राज्यात लोकसभेनंतर रंगणार शिक्षक, पदवीधर निवडणूक; १० जूनला मतदान, १३ जूनला निकाल
16
महादेव ॲपशी निगडित १ हजार कोटी शेअर्समध्ये? बनावट कंपन्यांद्वारे गुंतवणुकीचा संशय
17
महिनाभरात २२ लाख वाहनांची विक्री; २७ टक्के वाढ;  देशभरातील खरेदीदारांमध्ये प्रचंड उत्साह
18
टेनिस बॉल क्रिकेटमधून शिकलो ‘सुपला शॉट’; सूर्यकुमार यादवने सांगितली आठवण; आपसूक मारला जातो हा फटका
19
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
20
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर

बालभारतीच्या पाठ्यपुस्तक पुरवठा मोहिमेला अखेर मिळाला मुहूर्त; शालेय शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2021 7:01 PM

पाठ्यपुस्तकांच्या छपाईसाठी आवश्यक असणाऱ्या कागदासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल झाल्यामुळे पुस्तक छपाईस विलंब

ठळक मुद्देपहिली ते बारावीच्या सर्व पुस्तकांच्या पीडीएफ फाईल बालभारतीच्या वेबसाईटवर मोफत उपलब्ध करून दिल्या असून आजवर सुमारे १ कोटी ७८ लाख पुस्तके डाऊनलोडही झाली

पुणे: दरवर्षी १५ जूनला शाळा सुरु होते. त्यानुसार शासनाच्या वतीने समग्र शिक्षा अभियानांतर्गत शाळेच्या पहिल्या दिवशीच मोफत पाठपुस्तके दिली जातात. परंतु यंदा शाळा सुरु होऊन पंधरा दिवस झाल्यानंतर बालभारतीच्या वतीने पाठयपुस्तक पुरवठा शुभारंभ झाला आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ बालभारती येथे करण्यात आला. 

यावेळी बालभारतीचे संचालक दिनकर पाटील, प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रेय जगताप, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर टेमकर, बालभारतीचे नियंत्रक विवेक गोसावी आदी उपस्थित होते.

शासनाच्या वतीने दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठयपुस्तकांचे वाटप केले जाते. यावर्षी पाठ्यपुस्तकांच्या छपाईसाठी आवश्यक असणाऱ्या कागदासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल झाल्यामुळे पुस्तक छपाईस विलंब झाला होता. सदर न्यायालयीन प्रकरण निकालात निघाल्याने आता पुस्तक छपाई व पुरवठा सुरळीत सुरु झाला आहे. प्रथम टप्प्यात राज्याच्या दुर्गम भागात पुस्तकांचे वितरण होणार आहे. उर्वरित ठिकाणी देखील लवकरच पाठयपुस्तके उपलब्ध होतील, अशी माहिती त्यांनी दिली.

तसेच पाठ्यपुस्तक मंडळाने पहिली ते बारावीच्या सर्व पुस्तकांच्या पीडीएफ फाईल बालभारतीच्या वेबसाईटवर मोफत उपलब्ध करून दिल्या असून आजवर सुमारे १ कोटी ७८ लाख पुस्तके डाऊनलोड झाल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणVarsha Gaikwadवर्षा गायकवाडMaharashtraमहाराष्ट्र