शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्र परवान्यासाठी खोटी कागदपत्रे; बाळासाठी धमकावणे, गुन्ह्याची व्याप्ती मोठी, निलेशला १४ जूनपर्यंत पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 18:17 IST

निलेश चव्हाण याच्यावर वारजे पोलीस स्टेशनमध्ये कस्पटे कुटुंबीयांना धमकवल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे

पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील सहआरोपी निलेश चव्हाणला १४ जून पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. निलेश चव्हाण याच्यावर वारजे पोलीस स्टेशनमध्ये कस्पटे कुटुंबीयांना धमकवल्या प्रकरणी गुन्हा दाखल होता. आज त्याची पोलीस कोठडी संपल्याने पुन्हा न्यायालयात हजार करण्यात आले. कोर्टात दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर अखेर चव्हाणला १४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  

निलेश चव्हाण प्रकरण युक्तिवाद 

तपास अधिकारी 

आरोपीने बाळ निलेश चव्हाण यांच्या घरी ठेवलं होत. आरोपीचा एक पीसी जप्त करण्यात आला आहे. त्याचा पासवर्डची माहिती काढायची आहे. शस्त्र आम्हाला जप्त करायची आहे. याच शस्त्राने कस्पटे कुटुंबाला धमकावलं होत. शस्त्र परवाना मिळावा म्हणून खोटी कागदपत्र दिली होती. याबाबत तपास करायचा आहे. आरोपीने तपासात कुठलही सहकार्य केलं नाही. निलेश चव्हाण याची ५ दिवसांची कोठडी द्यावी अशी मागणी तपस अधिकाऱ्यांनी केली होती  

सरकारी वकील

लहान बाळाला निलेश चव्हाण याच्याकडे ठेवले होते. कारण नसताना बाळाला ठेवलं. आरोपीने कस्पटे यांना धमकी देवून बाहेर काढलं. कंबरेला लावलेली बंदूक दाखवत धमकावलं आहे. वापरलेलं पिस्तूल जप्त करायच आहे. आरोपी पळून गेला होता. तो फरार होता. त्यामुळे नेमका कुठ गेला होता याचा शोध घ्यायचा आहे. सगळा तपास सविस्तर करायचा आहे. शस्त्र परवाना मिळावा म्हणून जे कागदपत्र दिले होते ते बनावट आहेत का याचा तपास करायचा आहे. आरोपीवर याआधी देखील गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्याची व्याप्ती खूप मोठी आहे. तेव्हा जास्तीत जास्त पोलीस कोठडी मिळावी ही विनंती सरकारी वकिलांनी न्यायालयात केली होती. 

आरोपी वकील

सगळे कलम बेलेबल आहेत. एक कलम चुकीच आहे. बावधन मध्ये जो गुन्हा आहे त्यावरून पोलीस कोठडी मागितली होती. इथ पण त्याच आधारे पोलीस कोठडी मागत आहेत. त्याच घटनेत पुन्हा कोठडी मागत आहेत. लॅपटॉप ऑलरेडी जप्त केला आहे. या प्रकरणी निलेश चव्हाण आधीच कोठडीत आहेत. त्यांनी  बाळाला सांभाळल आहे. एकाच घटनेसाठी दोनदा पोलिस कोठडी मागत आहेत. बाळाच्या गुन्ह्यात बावधन पोलिसांनी आधीच अटक केली होती. एकाच गुन्ह्यात दोनदा अटक केली जात आहे हे चुकीच आहे. चुकीच्या आधारे कोठडी मागितली जात आहे. झालेल्या गुन्ह्याची दुसऱ्यांदा कोठडी मागत आहेत हे चुकीच आहे. बावधन पोलिसांनी याच गुन्ह्यासाठी १२ दिवसांची कोठडी पूर्ण झाली आहे. बावधन पोलिसांनी पूर्ण तपास केला आहे. असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात केला. 

दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर १४ जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. निलेश चव्हाणवर इतरही गुन्हे आहेत. तसेच पिस्तूलचा परवाना कुठून आणला? त्यासाठी बनावट कागदपत्रे दिली का? सखोल चौकशी करायची असल्याने पोलीस कोठडी देण्यात आली आहे.  

टॅग्स :PuneपुणेVaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकWomenमहिला