१८ महिन्यांपासून पगार न मिळाल्याने टोकाचे पाऊल; सुरक्षरक्षकाने व्हिडीओ बनवत मांडली आर्थिक विवंचनेची व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 15:53 IST2026-05-14T15:53:07+5:302026-05-14T15:53:16+5:30

पुण्यातील सिंहगड कॅम्पसमध्ये ते सुरक्षारक्षक होते, १८ महिन्यांपासून पगार न मिळाल्याने ते तणावात होते

Extreme step after not receiving salary for 18 months; Security guard makes video to express pain of financial hardship | १८ महिन्यांपासून पगार न मिळाल्याने टोकाचे पाऊल; सुरक्षरक्षकाने व्हिडीओ बनवत मांडली आर्थिक विवंचनेची व्यथा

१८ महिन्यांपासून पगार न मिळाल्याने टोकाचे पाऊल; सुरक्षरक्षकाने व्हिडीओ बनवत मांडली आर्थिक विवंचनेची व्यथा

धनकवडी : सिंहगड कॅम्पस येथील पन्हाळा हॉस्टेलमध्ये नियुक्तीस असलेल्या सुरक्षारक्षकाने १८ महिन्यांपासून पगार न मिळाल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि. १३) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. समीर माधव दाभोळकर (वय ५३) असे आत्महत्या केलेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे.

सिंहगड कॅम्पसमध्ये दाभोळकर हे सुरक्षारक्षक होते. १८ महिन्यांपासून पगार न मिळाल्याने ते तणावात होते. आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, आत्महत्या करण्यापूर्वी समीर दाभोळकर यांनी आपल्या मोबाइलवर एक व्हिडीओ रेकॉर्ड करून आपली व्यथा मांडली. या व्हिडीओमध्ये त्यांनी रखडलेल्या पगारामुळे मानसिक आणि आर्थिक तणाव वाढल्याचे नमूद केल्याची माहिती मिळत आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.

समीर दाभोळकर यांचे नातेवाईक शैलेश पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, त्यांना १८ महिन्यांपासून पगार मिळालेला नव्हता. त्या तणावातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगत, संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी ही त्यांनी केली आहे. तसेच, नातेवाईकांचा जबाब नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई करत असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल खिलारे यांनी दिली.

Web Title : 18 महीने से वेतन न मिलने पर सुरक्षा गार्ड ने की आत्महत्या

Web Summary : धनकवडी के सिंहगढ़ परिसर में एक सुरक्षा गार्ड ने 18 महीने से वेतन न मिलने के कारण आत्महत्या कर ली। समीर दाभोलकर ने अपनी जान लेने से पहले एक वीडियो रिकॉर्ड किया जिसमें उन्होंने अपनी वित्तीय कठिनाइयों का विवरण दिया। पुलिस मामले की जांच कर रही है, और रिश्तेदारों ने कार्रवाई की मांग की है।

Web Title : Security Guard Commits Suicide Due to 18 Months of Unpaid Salary

Web Summary : A security guard at Sinhgad campus, Dhankawadi, committed suicide after not receiving his salary for 18 months. Before taking his life, Sameer Dabholkar recorded a video detailing his financial struggles. Police are investigating the incident, and relatives demand action.