अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद - बघा VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 17:51 IST2026-05-14T17:49:58+5:302026-05-14T17:51:08+5:30
Bareilly Cyclone Video : नन्हे मियाँ हवेत सुमारे ४० ते ५० फूट उंचावर उडून काही अंतरावर असलेल्या एका मक्याच्या शेतात जाऊन पडले...

अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद - बघा VIDEO
उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये बुधवारी भीषण चक्रीवादळाने अक्षरश: तांडव केले आणि संपूर्ण जिल्ह्यातच हाहाकार माजवला. अचानक बदललेले हवामान आणि या नंतर आलेला सोसाट्याचा वारा आणि पावसाने नागरिकांना सावरण्याचीही संधी मिळाली नाही. या वादळात झाडे उन्मळून पडली आणि विजेचे खांबही कोसळले. मात्र, यातच, एक थरकाप उडवणारी घटनाही घडली आहे. एक निर्माणाधीन टीनशेड वादळात उडून गेले आणि त्यासोबत 'नन्हे मियाँ' नावाचा एक तरुणही हवेत उंच उडाला. या अंगावर शहारे आणणाऱ्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं? -
माध्यमांतील वृत्तानुसार, नन्हे मियाँ एका निर्माणाधीन मंगल कार्यालयाच्या कामात होते. अचानक आलेल्या वादळामुळे टीनशेड उडू लागले. स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांनी टीनशेडला बांधलेली दोरी घट्टपणे पकडली. मात्र वाऱ्याचा वेग एढा भयंकर होता की, काही सेकंदातच संपूर्ण टीनशेड उखडले गेले आणि नन्हे मियाँ देखील त्यासोबत काही फूट उंच हवेत उडाले.
यूपी- बरेली के नन्हे मियां तेज तूफान में बारातघर की टीनशेड का पाया पकड़े खड़े थे. आंधी तेज हुई तो टीनशेड उखड़ गई और उसके साथ नन्हे मियां हवा में उड़ गए.
— Narendra Pratap (@hindipatrakar) May 13, 2026
ऐसे उड़े कि टिन जमीन पर आई लेकिन नन्हें मियां देर तक उड़ने के बाद नीचे गिरे.
हाथ पांव दोनों टूट गए है. अब अस्पताल में भर्ती… pic.twitter.com/TJX04wQ1pD
मक्याच्या शेतात जाऊन पडले 'नन्हे मिया' -
नन्हे मियाँ हवेत सुमारे ४० ते ५० फूट उंचावर उडून काही अंतरावर असलेल्या एका मक्याच्या शेतात जाऊन पडले. या भीषण अपघातात त्यांचा हात फ्रॅक्चर झाला असून शरीराला गंभीर दुखापतही झाली आहे. हा सर्व प्रकरा एका स्थानिक व्यक्तीने बघितला आणि त्यांच्याकडे धाव घेतली. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी (SDM) रुग्णालयात जाऊन त्यांची विचारपूस केली असून सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही दिले आहे.