ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 18:25 IST2026-05-14T18:21:07+5:302026-05-14T18:25:57+5:30

Mamata Banerjee News: एका जनहित याचिकेवरील सुनावणीवेळी ममता बॅनर्जी वकिली पेहराव करत कोलकाता हायकोर्टात आल्या होत्या.

is west bengal former cm mamata banerjee really a lawyer submit documents bar council of india instructions know what happens in kolkata high court | ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?

ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?

Mamata Banerjee News: पश्चिम बंगाल निवडणुकीत पराभव झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या एका याचिकेच्या सुनाणीवेळी कोलकाता उच्च न्यायालयात हजर झाल्या. ममता बॅनर्जी वकील म्हणून या खटल्याची बाजू मांडणार असल्याचे म्हटले जात आहे. पारंपरिक काळा वकील कोट आणि पांढरा कॉलर बँड घालून ममता बॅनर्जी उच्च न्यायालयात गेल्या होत्या. यावरून आता बार बार कौन्सिल ऑफ इंडियाने पश्चिम बंगालच्या बार कौन्सिलला ममता बॅनर्जी यांच्या नोंदणी संबंधित माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत.

कोलकाता उच्च न्यायालयातील वकील आणि तृणमूल काँग्रेसचे चार वेळा खासदार राहिलेले कल्याण बॅनर्जी यांचे पुत्र सिरसन्या बॅनर्जी यांनी एक जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सुजॉय पॉल आणि न्या. पार्थ सारथी सेन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होत आहे. या सुनावणीसाठी ममता बॅनर्जी वकिली वेषभूषेत न्यायालयात आल्या होत्या. 

ममता बॅनर्जी खरेच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा

ममता बॅनर्जी यांची नोंदणी आणि वकिलीच्या स्थितीची माहिती घेण्यासाठी बार कौन्सिल ऑफ इंडियाने पश्चिम बंगाल बार कौन्सिलला पत्र लिहिले आहे. ममता बॅनर्जी वकिली पेहराव करून  उच्च न्यायालयात हजर झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. बार कौन्सिलने नोंदणी, वकिलीचा व्यवसाय स्थगित करणे व पुन्हा सुरू करणे, तसेच वकिलीच्या प्रमाणपत्रांसंबंधी सविस्तर माहिती दोन दिवसांच्या आत मागितली आहे.

दरम्यान, कोलकाता उच्च न्यायालयात ममता बॅनर्जी यांना पाहताच 'चोर, चोर' अशा घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. गर्दीतून वाट काढत त्या मोठ्या मुश्किलीने ममतादीदी गाडीपर्यंत पोहोचल्या. असे वृत्त आहे की, सुनावणी संपल्यानंतर आणि ममता बॅनर्जी कोर्टरूम क्रमांक १ मधून बाहेर पडत असताना, कॉरिडॉरमध्ये 'जय श्री राम'च्या घोषणा घुमल्या, याला 'जय बांगला'च्या घोषणांनी प्रत्युत्तर देण्यात आले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

 

Web Title : क्या ममता बनर्जी वाकई वकील हैं? बार काउंसिल ने मांगा प्रमाण।

Web Summary : ममता बनर्जी के वकील के रूप में अदालत में पेश होने के बाद, बार काउंसिल ऑफ इंडिया ने उनके पंजीकरण विवरण मांगे। इसके बाद, उनकी अदालत यात्रा के दौरान नारों से हंगामा मच गया।

Web Title : Is Mamata Banerjee Really a Lawyer? Bar Council Asks for Proof.

Web Summary : Bar Council of India seeks Mamata Banerjee's lawyer registration details after her court appearance in lawyer's attire. Following this, chaos erupted with slogans during her court visit.