Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम

PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम

'पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम' (PCOS) चं नाव बदलून आता 'पॉलीएंडोक्राइन मेटाबॉलिक ओव्हेरियन सिंड्रोम' (PMOS) असं करण्यात आलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 17:38 IST2026-05-14T17:37:10+5:302026-05-14T17:38:40+5:30

'पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम' (PCOS) चं नाव बदलून आता 'पॉलीएंडोक्राइन मेटाबॉलिक ओव्हेरियन सिंड्रोम' (PMOS) असं करण्यात आलं आहे.

PCOS Name Changed To PMOS: How This Impacts Women Globally And In India | PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम

PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम

'द लॅन्सेट' या प्रसिद्ध मेडिकल जर्नलमध्ये एका मेडिकल कंडीशनच्या नावाबाबत एक नवीन रिसर्च समोर आला आहे. 'पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम' (PCOS) चं नाव बदलून आता 'पॉलीएंडोक्राइन मेटाबॉलिक ओव्हेरियन सिंड्रोम' (PMOS) असं करण्यात आलं आहे. या बदलाचा जगभरातील १७ कोटी महिलांवर थेट परिणाम होईल. या नावात बदल केल्यामुळे या आजाराचं निदान आणि तपासणी प्रक्रियेत वेग येण्याची शक्यता आहे.

जगभरातील १७ कोटी महिलांवर या नावाचा परिणाम होण्याचं कारण म्हणजे इतक्या मोठ्या संख्येने महिला या समस्येने त्रस्त आहेत. 'द लॅन्सेट'मध्ये प्रसिद्ध झालेल्या रिसर्चनुसार, दर ८ पैकी १ महिलेला या सिंड्रोमची समस्या आहे, जी त्यांच्या हार्मोन्स, फर्टिलिटी आणि संपूर्ण आरोग्याशी खोलवर निगडित आहे.

नाव बदलण्याचा निर्णय का घेतला?

अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर PCOS चं नाव बदलून PMOS करण्यात आलं आहे. जुन्या नावामुळे या आजाराची तपासणी आणि उपचारात अडथळे येत होते. त्यामुळे महिलांना वेळेवर उपचार मिळत नसत आणि त्यांना दीर्घकाळ या त्रासाला सामोरं जावं लागत असे.

संशोधकांच्या मते, बऱ्याच काळापासून या आजाराला केवळ 'गायनोकॉलॉजिकल' किंवा 'ओव्हेरियन डिसऑर्डर' मानलं जात होतं. परंतु अनेक नवीन पुरावे असं सांगतात की, या स्थितीत इन्सुलिन, अँड्रोजन, न्यूरोएंडोक्राइन आणि ओव्हेरियन हार्मोन्समध्ये होणारे 'एंडोक्राइन' बदलही तितकेच कारणीभूत असतात.

निदानात विलंब का होत होता?

रिसर्चनुसार, 'पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम'चे निदान करण्यासाठी ओवेरियन सिस्ट असणं अनिवार्य मानलं जात होतं. मात्र प्रत्यक्षात असं दिसून आलं की, या समस्येने त्रस्त असलेल्या प्रत्येक महिलेला ओवेरियन सिस्ट असतीलच असं नाही. अनेक महिलांना सिस्टशिवायही ही समस्या असू शकते. या तांत्रिक अडचणीमुळे योग्य निदानात आणि उपचारात उशीर होत होता.

'एंडोक्राइन' आणि 'मेटाबॉलिक' शब्द जोडण्याचं कारण

संशोधकांच्या मते, नवीन नावात हे दोन शब्द जोडण्यामागे या आजाराच्या लक्षणांचा आधार आहे. ही समस्या एंडोक्राइन, मेटाबॉलिक, रिप्रॉडक्टिव्ह, सायकॉलॉजिकल आणि डर्माटोलॉजिकल संकेत देते. त्यामुळे निदानासाठी या सर्व घटकांना समान महत्त्व मिळावं या उद्देशाने नावामध्ये हे बदल करण्यात आले आहेत.

निदानासाठी कोणती लक्षणं आधार मानली जातील?
 
२० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये खालीलपैकी किमान २ लक्षणं असणं आवश्यक आहे, तर १० ते १९ वर्षांच्या मुलींमध्ये पहिली दोन लक्षणं असणं गरजेचं आहे.

ओलिगो एनोव्हुलेशन

क्लीनिकल आणि बायोकेमिकल हायपरएंड्रोजेनिझ्म

हायपरअँड्रोजेनिझम (पुरुषांमधील हार्मोन्सचे प्रमाण वाढणे)

अल्ट्रासाऊंडमध्ये पॉलीसिस्टिक ओव्हरी किंवा AMH ची हाय लेव्हल

मेटाबॉलिक लक्षणं (लठ्ठपणा, रक्तातील साखरेचं प्रमाण असामान्य असणं, टाईप-२ डायबेटिस, हायपरटेन्शन, कोलेस्ट्रॉलमधील बिघाड, लिव्हरशी संबंधित आजार, हृदयविकार, स्लीप ॲप्निया)

रिप्रोडक्टिव्ह लक्षणं (अनियमित मासिक पाळी, इनफर्टिलिटी, गर्भधारणेतील समस्या, एंडोमेट्रियल कॅन्सर)

मानसिक लक्षणं (नैराश्य, अस्वस्थता, खाण्यापिण्याच्या सवयींमधील बिघाड)

त्वचेसंबंधित लक्षणं (पिंपल्स, केस गळणं, चेहऱ्यावर अनावश्यक केस येणं)

PCOS चं नाव बदलून PMOS करणं हे दर्शवते की, या मेडिकल कंडिशनची अनेक रूपं आहेत. केवळ ओवरी किंवा सिस्टशी संबंधित दृष्टिकोन ठेवल्याने अनेक महिला निदानापासून वंचित राहण्याचा धोका होता, जो आता कमी होईल.

Web Title : पीसीओएस का नाम बदलकर पीएमओएस: 17 करोड़ महिलाओं के स्वास्थ्य पर असर।

Web Summary : पीसीओएस अब पीएमओएस (पॉलीएंडोक्राइन मेटाबॉलिक ओवेरियन सिंड्रोम) है, जिससे 17 करोड़ महिलाएं प्रभावित हैं। नाम बदलने का उद्देश्य तेजी से निदान करना, हार्मोनल, मेटाबॉलिक, प्रजनन और मनोवैज्ञानिक पहलुओं को संबोधित करना है, जो अक्सर छूट जाते हैं, जिससे उपचार में देरी होती है। नए मानदंड निदान के लिए मेटाबॉलिक और एंडोक्राइन कारकों पर जोर देते हैं।

Web Title : PCOS renamed PMOS: Affecting 170 million women's health worldwide.

Web Summary : PCOS is now PMOS (Polyendocrine Metabolic Ovarian Syndrome), impacting 170 million women. The name change aims for quicker diagnosis, addressing hormonal, metabolic, reproductive, and psychological aspects often missed, leading to delayed treatment. New criteria emphasize metabolic and endocrine factors for diagnosis.