सोन्याच्या मंगळसूत्रांना लाजवतील चांदीची मंगळसूत्र; १० पेंडंट डिझाईन्स, साधा-मॉडर्न लूक दिसेल
Updated:May 13, 2026 15:37 IST2026-05-13T15:24:07+5:302026-05-13T15:37:56+5:30
Light Weight Silver Mangalsutra for Everyday Use (Silver Pendant Mangalsutra Designs) : सिल्व्हर ज्वेलरी असल्यामुळे हे मंगळसूत्र केवळ साडीवरच नाही तर कुर्ता, जीन्स आणि वेस्टर्न टॉप्सवरही खूप छान दिसते.

सिलव्हर पेडंट आणि काळे मणी असलेले मंगळसूत्र हे सध्याच्या फॅशनमध्ये खूपच लोकप्रिय आहेत. या विशिष्ट पॅटर्नबद्दल समजून घेऊ. (Lightweight Silver Mangalsutra for Everyday Use)
चांदीचे मंगळसूत्र हे पारंपारीक काळ्या मण्यांना एक आधुनिक लूक देतात आणि मॉडर्न स्टाईलचे दिसतात. (10 Silver Mangalsutra Designs)
ही मंगळसूत्र ऑक्सिडाईज्ड सिल्व्हर किंवा स्टार्लिंग सिल्व्हर या दोन्ही प्रकारात उपलब्ध असतात.
या प्रकारात काळ्या मण्यांच्या सरीमध्ये छोटे छोटे चांदीचे मणी गुंफलेले असतात. यामुळे मण्यांच्या सरीला एक वेगळी चमक आणि डिझायनर लूक मिळतो.
या मंगळसूत्राचे मुख्य आकर्षण म्हणजे त्याचे सिल्व्हर पेंडंट. हे पेंडंट कधी साध्या भौमितिक आकाराचे असते तर कधी नक्षीकाम, मोर किंवा फुलांच्या डिझाईन्स असतात.
सोन्याच्या जड मंगळसूत्राच्या तुलनेत ही चांदीची मंगळसूत्र वजनाला हलकी असतात आणि नाजूक असतात.
हे मंगळसूत्र ऑफिसवेअर किंवा रोजच्या वापरासाठी अत्यंत सोयीस्कर आणि स्टायलिश दिसते.
सिल्व्हर ज्वेलरी असल्यामुळे हे मंगळसूत्र केवळ साडीवरच नाही तर कुर्ता, जीन्स आणि वेस्टर्न टॉप्सवरही खूप छान दिसते.
सोन्याच्या मंगळसूत्राच्या तुलनेत हे खूपच स्वस्त असल्यानं आपण वेगवेगळ्या डिझाईन्सचा अनेक प्रकारांचा संग्रह करू शकता.
मंगळसूत्राची चमक टिकवण्यासाठी ते ओलावा आणि हवेपासून दूर ठेवण्यास मत जास्त काळ टिकते. काळे पडल्यास ते सहज स्वच्छ करता येते.