हॉलिवूडचा 'हा' सिनेमा भारतात रिलीज झाला आणि ५० कोटींहून जास्त कमावून गेला; आजही थिएटरमध्ये 'हाऊसफुल्ल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 16:09 IST2026-05-13T16:02:34+5:302026-05-13T16:09:32+5:30

या चित्रपटाची सध्या खूप चर्चा आहे. माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर या चित्रपटाने भारतात ५० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.

michael movie box office collection day 19 who is jaffer jackson played michael jackson | हॉलिवूडचा 'हा' सिनेमा भारतात रिलीज झाला आणि ५० कोटींहून जास्त कमावून गेला; आजही थिएटरमध्ये 'हाऊसफुल्ल'

हॉलिवूडचा 'हा' सिनेमा भारतात रिलीज झाला आणि ५० कोटींहून जास्त कमावून गेला; आजही थिएटरमध्ये 'हाऊसफुल्ल'

Michael Box office Collection: 'मायकल' या हॉलीवूड चित्रपटाची सध्या चर्चा आहे. जगप्रसिद्ध पॉप स्टार मायकल जॅक्सनच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारीत आहे. या चित्रपटाने रिलीजच्या प्रदर्शनाच्या १९ व्या दिवशी भारतातील १,४५४ शोजच्या माध्यमातून सुमारे १.०५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या नव्या आकडेवारीमुळे चित्रपटाचे भारतातील एकूण ग्रॉस कमाई आता ६४.७१ कोटी रुपयांवर पोहोचले असून, भारतातील (Net) कमाई ५४.०५ कोटी रुपये झाली आहे.

या चित्रपटाच्या यशामागे सर्वात मोठे कारण म्हणजे जगप्रसिद्ध पॉप स्टार मायकल जॅक्सनची लोकप्रियता. त्याचं जीवन, संगीतातील कारकीर्द आणि त्याच्याशी संबंधित वाद याबद्दलची उत्सुकता आजही प्रेक्षकांमध्ये कायम आहे. यामुळेच विविध वयोगटातील प्रेक्षक चित्रपटगृहांकडे आकर्षित होत आहेत. सोशल मीडियावरील सकारात्मक प्रतिक्रिया आणि बॉक्स ऑफिसवरील प्रतिसाद यामुळे या चित्रपटाला आणखी यश मिळत आहे. आता हा चित्रपट तिसऱ्या आठवड्यात प्रवेश करत असून, पुढील दिवसांतही कमाई कशी वाढते, याकडे सर्वांचं लक्ष आहे.



'मायकल' चित्रपटाच्या सुरुवातीच्या कमाईवर नजर टाकली तर १० व्या दिवशी या चित्रपटाने सुमारे २.८७ कोटी ते ३.२१ कोटी रुपयांची कमाई केली होती, ज्यामुळे त्यावेळी चित्रपटाने भारतात ३६ कोटींचा आकडा पार केला होता. एकूणच 'मायकल' या चित्रपटाने माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर प्रेक्षकांची गर्दी खेचून आणली. भारतातही मायकल जॅक्सनची किती क्रेझ आहे हेच यावरुन दिसून आलं. 'मायकल' या चित्रपटात मायकल जॅक्सनचा पुतण्या जॅफर जॅक्सनने भूमिका साकारली आहे. जॅफरच्या भूमिकेचं खूप कौतुक होतंय. 

Web Title : हॉलीवुड की 'माइकल' भारत में हिट, 50 करोड़ से ज्यादा की कमाई, शो हाउसफुल

Web Summary : माइकल जैक्सन के जीवन पर आधारित हॉलीवुड फिल्म 'माइकल' भारत में हिट हो गई है। जैक्सन की लोकप्रियता और सकारात्मक चर्चा के कारण फिल्म ने 64 करोड़ रुपये से अधिक (54 करोड़ रुपये नेट) की कमाई की और दर्शकों को आकर्षित कर रही है।

Web Title : Hollywood's 'Michael' Hits India, Earns Over ₹50 Crore, Housefull Shows

Web Summary : Hollywood's 'Michael,' based on Michael Jackson's life, is a hit in India. Grossing over ₹64 crore (₹54 crore net), driven by Jackson's popularity and positive word-of-mouth, the film continues to draw crowds.