'खतरो के खिलाडी'मध्ये स्टंट करताना दिसणार 'छोटी रुही', म्हणाली, "लोकांचा माझ्याबद्दलचा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 16:20 IST2026-05-13T16:20:05+5:302026-05-13T16:20:59+5:30

शोबद्दल काय म्हणाली रुहानिका?

child actress ruhanika dhawan to participate in khatron ke khiladi 15 show talks about it | 'खतरो के खिलाडी'मध्ये स्टंट करताना दिसणार 'छोटी रुही', म्हणाली, "लोकांचा माझ्याबद्दलचा..."

'खतरो के खिलाडी'मध्ये स्टंट करताना दिसणार 'छोटी रुही', म्हणाली, "लोकांचा माझ्याबद्दलचा..."

'ये है मोहोब्बते' मालिकेतून घराघरात पोहोचलेली छोटी रुही म्हणजे अभिनेत्री रुहानिका धवन आता मोठी झाली आहे. ती आता १८ वर्षांची आहे. नुकतीच रुहानिकाने १२ वीची परीक्षा दिली. रुहानिकाने खूप कमी वयात यश मिळवलं. आता ती एकदम स्टायलिश आणि बोल्ड लूकमध्ये दिसते. इतकंच नाही तर रुहानिका लवकरच 'खतरो के खिलाडी १५'मध्ये दिसणार आहे. याबद्दल आता तिने प्रतिक्रिया दिली आहे.

एका मुलाखतीत रुहानिका म्हणाली, "लोकांना मी आजही ती टीव्हीवरची छोटी, रडणारी मुलगी वाटते. पण आता मला या शोच्या माध्यमातून लोकांचा माझ्याकडे पाहण्याचा तोच दृष्टिकोन बदलायचा आहे. मला खरंच असं वाटतं की मी आता मोठं होण्याच्या फेजमध्ये आहे. मी आतापर्यंत फक्त टीव्हीवर काम केलं आहे. माझ्यासाठी आता हे जग खूप वेगळं आहे."

ती पुढे म्हणाली,"मी नेहमीच कंफर्ट झोनमधून बाहेर पडायला लावणाऱ्या गोष्टींच्या मागे धावते. कारण त्यातच खरी मजा असते. मी लोकांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी उत्सुक आहे. माझ्या भीतीशी मी आता दोन हात करणार आहे. कदाचित पहिल्यांदाच मला सगळे अशा रुपात पाहणार आहेत. मी रिस्क घ्यायला घाबरत नाही. लोकांना असं वाटेल की अरे ही तर छोटी मुलगी आहे पण मी तोच विचार बदलणार आहे. रोहित सरही मला इतरांपेक्षा वेगळं ट्रीट करणार नाहीत. त्यांनी उलट माझ्यासोबत जास्त कडक असावं असं मला वाटतं. माझ्यावर दबाव असतो तेव्हा मी आणखी चांगलं काम करते. ते मला इतरांसारखंच मार्गदर्शन करतील हे मला माहितीये. "

'ये है मोहोब्बते' मालिकेतून घराघरात पोहोचलेली छोटी रुही म्हणजे अभिनेत्री रुहानिका धवन आता मोठी झाली आहे. ती आता १८ वर्षांची आहे. नुकतीच रुहानिकाने १२ वीची परीक्षा दिली. रुहानिकाने खूप कमी वयात यश मिळवलं. आता ती एकदम स्टायलिश आणि बोल्ड लूकमध्ये दिसते. इतकंच नाही तर रुहानिका लवकरच 'खतरो के खिलाडी'शोमध्ये दिसणार आहे. याबद्दल आता तिने प्रतिक्रिया दिली आहे.

एका मुलाखतीत रुहानिका म्हणाली, "लोकांना मी आजही ती टीव्हीवरची छोटी, रडणारी मुलगी वाटते. पण आता मला या शोच्या माध्यमातून लोकांचा माझ्याकडे पाहण्याचा तोच दृष्टिकोन बदलायचा आहे. मला खरंच असं वाटतं की मी आता मोठं होण्याच्या फेजमध्ये आहे. मी आतापर्यंत फक्त टीव्हीवर काम केलं आहे. माझ्यासाठी आता हे जग खूप वेगळं आहे."

ती पुढे म्हणाली,"मी नेहमीच कंफर्ट झोनमधून बाहेर पडायला लावणाऱ्या गोष्टींच्या मागे धावते. कारण त्यातच खरी मजा असते. मी लोकांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी उत्सुक आहे. माझ्या भीतीशी मी आता दोन हात करणार आहे. कदाचित पहिल्यांदाच मला सगळे अशा रुपात पाहणार आहेत. मी रिस्क घ्यायला घाबरत नाही. लोकांना असं वाटेल की अरे ही तर छोटी मुलगी आहे पण मी तोच विचार बदलणार आहे. रोहित सरही मला इतरांपेक्षा वेगळं ट्रीट करणार नाहीत. त्यांनी उलट माझ्यासोबत जास्त कडक असावं असं मला वाटतं. माझ्यावर दबाव असतो तेव्हा मी आणखी चांगलं काम करते. ते मला इतरांसारखंच मार्गदर्शन करतील हे मला माहितीये. "

Web Title : 'खतरों के खिलाड़ी' में स्टंट करती दिखेंगी 'ये है मोहब्बतें' की रूही।

Web Summary : 'ये है मोहब्बतें' से मशहूर रूही, रुहानिका धवन, अब 18 साल की हैं और 'खतरों के खिलाड़ी 15' में दिखेंगी। वह लोगों की अपनी छवि बदलने और शो में अपने डर का सामना करने और जोखिम लेने के लिए तैयार हैं।

Web Title : 'Yeh Hai Mohabbatein's' Ruhi to do stunts in 'Khatron Ke Khiladi'.

Web Summary : Ruhaanika Dhawan, known as Ruhi from 'Yeh Hai Mohabbatein', is now 18 and will appear in 'Khatron Ke Khiladi 15'. She aims to change people's perception of her and is ready to face her fears and take risks on the show.