शरीराच्या 'या' ८ लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करु नका; मोठा आजार होण्याआधीच काळजी घ्या
Updated:May 12, 2026 20:57 IST2026-05-12T20:29:07+5:302026-05-12T20:57:32+5:30
Don't Ignore These Body Signals : व्यायाम किंवा डाएट न करताही वजन वेगानं कमी होणं किंवा वाढणं हे हॉर्मोनल असंतुलनाचे किंवा अंतर्गत आजाराचे संकेत असू शकतात.

आपल्या शरीरात होणारे छोटे बदल हे भविष्यातील मोठ्या आजारांचे संकेत असू शकतात. आरोग्याकडे दुर्लक्ष न करता काही लक्षणांकडे वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे. (Health Indicators Don't Ignore These Body Signals)
पुरेशी झोप आणि आहार घेऊनही जर जास्त थकवा येत असेल तर ते एनिमिया, मधूमेह किंवा थायरॉईडचे लक्षण असू शकते. (Red Flags When To Consult Doctor)
व्यायाम किंवा डाएट न करताही वजन वेगानं कमी होणं किंवा वाढणं हे हॉर्मोनल असंतुलनाचे किंवा अंतर्गत आजाराचे संकेत असू शकतात.
तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ राहणारा खोकला किंवा पायऱ्या चढताना होणारी धाप याकडे दुर्लक्ष करू नका.
अंगावरील तिळाचा आकार बदलणे, जखम लवकर न भरणं किंवा त्वचेचा रंग बदलणं ही धोक्याची घंटा असू शकते.
सततचे अपचन, बद्धकोष्टता किंवा शौचावाटे रक्त पडणं यांसारख्या लक्षणांसाठी त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.
छातीत दडपण येणं किंवा डाव्या हाताकडे जाणारी वेदना हे हृदयाच्या विकाराचे प्राथमिक लक्षण असू शकते.
अचानक अंधारी येणं, अस्पष्ट दिसणं किंवा वारंवार चक्कर येणं हे रक्तदाब किंवा मज्जासंस्थेशी संबंधित असू शकते.
शरीराच्या कोणत्याही भागात नवीन गाठ जाणवल्यास तिची वेळीच तपासणी करणं आवश्यक आहे. शरीराचे हे अलार्म ओळखून वेळीच उपचार घेतल्यास गंभीर गुंतागुंत टाळता येते.