'सावळ्याची जणू सावली' फेम प्राप्ती रेडकर खऱ्या आयुष्यात खूपच मॉर्डन, तिचं वय ऐकून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 16:59 IST2026-05-12T16:55:04+5:302026-05-12T16:59:05+5:30

मालिकेत शांत स्वभावाची साधी भोळी दिसणारी प्राप्ती खऱ्या आयुष्यात मात्र फारच मॉर्डन आहे.

'सावळ्याची जणू सावली' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेत मुख्य भूमिका साकारून अभिनेत्री प्राप्ती रेडकर घराघरात पोहोचली.

मालिकेत शांत स्वभावाची साधी भोळी दिसणारी प्राप्ती खऱ्या आयुष्यात मात्र फारच मॉर्डन आहे.

प्राप्ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. अनेकदा ती तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

कधी साडी, कधी वन पीसमध्ये प्राप्ती तिच्या अदा दाखवते. तिच्या फोटोंवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात.

प्राप्तीला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. अनेक मालिकांमध्ये काम तिने केलं आहे.

'किती सांगायचंय मला','तू माझा सांगाती','मेरे साई' आणि 'काव्यांजली'मध्ये ती महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसली.

प्राप्तीचा ५ एप्रिल रोजी वाढदिवस साजरा झाला. ती २२ वर्षांची आहे.

अभिनयाबरोबरच प्राप्तीने कराटेचं शिक्षणही घेतलं आहे. तिच्याकडे ब्लॅक बेल्टदेखील आहे.

याशिवाय तिने किक बॉक्सिंगचंही शिक्षण घेतलं आहे. ती एक उत्कृष्ट डान्सरही आहे.