तमन्ना भाटियाच्या ट्रेनरचा सल्ला, ३६ कंबर २८ करण्याचा उपाय-३ हाय प्रोटीन स्नॅक्स

Updated:May 12, 2026 18:00 IST2026-05-12T18:00:00+5:302026-05-12T18:00:02+5:30

Healthy snacks to lose belly fat: Fat loss diet snacks for busy schedule: आपल्याला आपली ३२ ची कंबर २८ करायची असेल, तर या अरबट-चरबट खाण्याला निरोगी पर्यायांनी बदलणे आवश्यक आहे.

तमन्ना भाटियाच्या ट्रेनरचा सल्ला, ३६ कंबर २८ करण्याचा उपाय-३ हाय प्रोटीन स्नॅक्स

सुप्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या फिटनेसचे लाखो चाहते आहेत. तिचा हा सुपर स्लिम आणि एव्हरग्रीन लूक फक्त जिममधील मेहनतीमुळे नाही तर तिच्या शिस्तबद्ध आहारामुळेही आहे. तमन्नाचे फिटनेस ट्रेनर सांगतात की वजन कमी करण्यासाठी उपाशी राहण्यापेक्षा योग्य वेळी योग्य पदार्थ खाणं महत्त्वाचे असते. (Fat loss diet snacks for busy schedule)

तमन्ना भाटियाच्या ट्रेनरचा सल्ला, ३६ कंबर २८ करण्याचा उपाय-३ हाय प्रोटीन स्नॅक्स

ऑफिसमध्ये काम करताना दुपारी ४ किंवा ५ च्या दरम्यान आपल्याला छोटीशी भूक लागते. अशावेळी आपण अनेकदा चहा-बिस्किटे, वडापाव किंवा चिप्स यांसारखे अनहेल्दी पदार्थ खातो. ज्यामुळे कॅलरीज वाढतात आणि पोटाचा घेर सुटू लागतो. पण, जर आपल्याला आपली ३२ ची कंबर २८ करायची असेल, तर या अरबट-चरबट खाण्याला निरोगी पर्यायांनी बदलणे आवश्यक आहे. (Best low calorie snacks for working professionals)

तमन्ना भाटियाच्या ट्रेनरचा सल्ला, ३६ कंबर २८ करण्याचा उपाय-३ हाय प्रोटीन स्नॅक्स

ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांसाठी जिथे शारीरिक हालचाल कमी असते, तिथे 'हाय-प्रोटीन' स्नॅक्स महत्त्वाची भूमिका बजावतात. सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर सिद्धार्थ सिंग म्हणतात जेव्हा आपण प्रोटीनयुक्त स्नॅक्स खातो, तेव्हा आपल्याला वारंवार भूक लागत नाही आणि आपण ओव्हरईटिंगपासून वाचू शकतो. तमन्नाच्या ट्रेनरने काही स्नॅक्स सुचवले आहेत जे आपल्या ऑफिस बॅगेत सहज ठेवता येतील आणि वजनही कमी होऊ शकते.

तमन्ना भाटियाच्या ट्रेनरचा सल्ला, ३६ कंबर २८ करण्याचा उपाय-३ हाय प्रोटीन स्नॅक्स

बाहेर मिळणाऱ्या प्रोटीन बारमध्ये भरपूर साखर असते. त्याऐवजी घरी बनवलेला प्रोटीन बार खा. त्यात ओट्स, खजूर, शेंगदाणे आणि सीड्स घाला. हे बार खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि प्रथिनांची कमरता भरुन निघते.

तमन्ना भाटियाच्या ट्रेनरचा सल्ला, ३६ कंबर २८ करण्याचा उपाय-३ हाय प्रोटीन स्नॅक्स

पारंपरिक लाडूंना आरोग्यदायी टच देऊन आपण प्रोटीन लाडू तयार करु शकता. डिंक, अळीव, सत्तू किंवा सुका मेवा वापरुन बनवलेले हे लाडू ऑफिसमधील छोट्या भुकेवर रामबाण उपाय आहे. यात साखरेऐवजी गुळाचा किंवा खजुरचा वापर करु शकतो. ज्यामुळे आपले वजन कमी करण्यास अधिक मदत करतात.

तमन्ना भाटियाच्या ट्रेनरचा सल्ला, ३६ कंबर २८ करण्याचा उपाय-३ हाय प्रोटीन स्नॅक्स

ऑफिसमधल्या छोट्या भुकेसाठी ग्रीक योगर्ट हा सगळ्यात चांगला पर्याय आहे. साध्या दह्यापेक्षा यात प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. यात आपण सफरचंद, बेरी किंवा केळीसारखी फळे टाकून खावू शकतो. यामुळे आपले पोट भरेल आणि भूकही लागणार नाही. हे पदार्थ पचायला हलके असल्यामुळे वजनही वाढणार नाही.