वजन जास्त असो किंवा कमी- नो टेन्शन...५ लक्षणं तुमच्यात दिसली तर तुम्ही आहात एकदम फिट ...
Updated:May 12, 2026 09:35 IST2026-05-12T09:34:57+5:302026-05-12T09:35:02+5:30

वजन कमी आहे किंवा जास्त आहे यापेक्षा तुम्ही किती फिट आहात, निरोगी आहात हे जास्त महत्त्वाचं असतं. म्हणूनच पुढे सांगितलेल्या काही गोष्टी तपासून पाहा आणि तुमचा फिटनेस स्वत:च तपासा...
सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अंथरुणावर पडताच रात्री झोप येणं. याचा अर्थ तुमच्या शरीरात कॉर्टिसॉल हार्मोन कमी प्रमाणात आहेत. पचन व्यवस्थित होत आहे. मज्जासंस्थेचे काम उत्तम आहे.
सकाळी उठल्यानंतर काही जणांना खूप भूक लागलेली असते. हे देखील निरोगी शरीराचं एक वैशिष्ट्य आहे. याचा अर्थ असा की तुमची पचन क्रिया, चयापचय क्रिया दोन्हीही उत्तम आहेत.
काही अभ्यासांनुसार असं दिसून आलं आहे की जे लोक जलद गतीने चालतात त्यांचे हृदय मजबूत असते. या लोकांना मधुमेहही सहसा होत नाही.
शरीरावर झालेल्या जखमा लवकर भरून निघत असतील तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती आणि सेल रिपेअरिंग सिस्टीम या दोन्हीही चांगल्या आहेत.
सकाळी झोपेतून उठल्यानंतर छान फ्रेश वाटत असेल आणि पोट व्यवस्थित साफ होत असेल तर हे देखील एक निरोगी व्यक्तीचं लक्षण आहे.