बॉलिवूड अभिनेत्री लग्नाच्या ४ वर्षांनी घेणार घटस्फोट? सोशल मीडियावर नवऱ्याला केलं Unfollow; गोव्यात केलेलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 09:07 IST2026-05-12T08:56:24+5:302026-05-12T09:07:31+5:30

गोव्यात केलेल्या लग्नाची चर्चा, पण आता अभिनेत्रीचा संसार मोडणार असल्याने चाहत्यांना जबर धक्का. कोण आहे ती?

actress mouni roy taking divorce with husband suraj nambiar after 4 years of marriage | बॉलिवूड अभिनेत्री लग्नाच्या ४ वर्षांनी घेणार घटस्फोट? सोशल मीडियावर नवऱ्याला केलं Unfollow; गोव्यात केलेलं लग्न

बॉलिवूड अभिनेत्री लग्नाच्या ४ वर्षांनी घेणार घटस्फोट? सोशल मीडियावर नवऱ्याला केलं Unfollow; गोव्यात केलेलं लग्न

काही दिवसांपूर्वी रणबीर कपूरसोबत काम केलेली अभिनेत्री एवलिन शर्माच्या घटस्फोटाच्या बातमीने सर्वांना धक्का बसला. आता रणबीरची आणखी एक हिरोईन घटस्फोट घेणार असल्याची चर्चा आहे. ही अभिनेत्री म्हणजे मौनी रॉय. (mouni roy) 'ब्रम्हास्त्र' चित्रपटात काम केलेली मौनी आणि तिचे पती सूरज नांबियार हे दोघे घटस्फोट घेणार असल्याची चर्चा आहे. मौनी आणि सूरजने एकमेकांना इंस्टाग्रामवर 'अनफॉलो' केल्याची बातमी समोर आल्याने या चर्चांना आणखीनच जोर मिळाला आहे.

केवळ अनफॉलो करणेच नव्हे, तर चाहत्यांच्या असेही लक्षात आले आहे की, गेल्या काही काळापासून या दोघांनीही एकमेकांसोबतचे नवीन फोटो शेअर केलेले नाहीत. जे जोडपे नेहमीच आपल्या रोमँटिक फोटोंमुळे चर्चेत असायचे. पण सध्या त्यांच्या प्रोफाईलवर एकमेकांसोबतचा कोणताच लेटेस्ट फोटो नसल्याने त्यांच्या वैवाहिक आयुष्यात सर्व काही ठीक नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

गोव्यात झाले होते लग्न

मौनी रॉय आणि सूरज नांबियार २७ जानेवारी २०२२ रोजी विवाहबंधनात अडकले होते. गोव्यातील या ग्रँड डेस्टिनेशन वेडिंगचे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. बंगाली आणि मल्याळी अशा दोन्ही परंपरांनुसार हा विवाह सोहळा पार पडला होता, ज्यामध्ये बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज सहभागी झाले होते. मौनी आणि सूरज यांची पहिली भेट २०१९ मध्ये दुबईत झाली होती. सुमारे दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. लग्नानंतरही हे दोघे अनेकदा परदेश दौऱ्यावर आणि कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले होते.

मौनी रॉयची कारकीर्द

'क्योकी सास भी कभी बहू थी' या मालिकेतून करिअरची सुरुवात करणाऱ्या मौनीला 'नागिन' मालिकेमुळे खरी ओळख मिळाली. त्यानंतर तिने अक्षय कुमारच्या 'गोल्ड' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. रणबीर कपूर-आलिया भट्ट यांच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटातील तिने साकारलेली 'जुनून' ही खलनायिकेची भूमिका विशेष गाजली होती. सध्या घटस्फोटांच्या या चर्चांवर चाहत्यांना या दोघांकडून अधिकृत स्पष्टीकरणाची अपेक्षा आहे.

Web Title : मौनी रॉय तलाक की अफवाहें: चार साल बाद पति को अनफॉलो किया?

Web Summary : मौनी रॉय और पति सूरज नांबियार के बीच इंस्टाग्राम पर एक-दूसरे को अनफॉलो करने के बाद तलाक की अफवाहें उड़ीं। उनकी हाल की तस्वीरों की कमी अटकलों को बढ़ावा दे रही है। उन्होंने 2022 में गोवा में शादी की। प्रशंसक आधिकारिक पुष्टि का इंतजार कर रहे हैं।

Web Title : Mouni Roy Divorce Rumors: Unfollows Husband After Four Years?

Web Summary : Mouni Roy and husband Suraj Nambiar face divorce rumors after unfollowing each other on Instagram. Their lack of recent photos together fuels speculation. They wed in Goa in 2022. Fans await official confirmation.