लग्नसराईसाठी घ्या खास इरकल पैठणी; १२ जबरदस्त कलर कॉम्बिनेशन्स, शाही लूक येईल
Updated:May 11, 2026 17:03 IST2026-05-11T16:41:44+5:302026-05-11T17:03:51+5:30
Special Irkal Paithani for Wedding Season : या साड्या सुती, रेशमी किंवा दोन्हींच्या मिश्रणातून तयार केल्या जातात.

इरकल आणि पैठणी हे महाराष्ट्रातील वस्त्रकलेचे दोन अत्यंत महत्वाचे आणि पारंपारीक प्रकार आहे. या दोन्ही साड्यांचे वैशिष्ट्ये डिझाईन आणि रंगाचे पॅटर्न्स पाहूया. (Special Irkal Paithani for Wedding Season)
पैठणीचे सर्वात मुख्य आकर्षण म्हणजे तिचा सोन्याच्या किंवा चांदीच्या जरीचा पदर असतो. (Irkal Paithani in 12 Colors)
यावर पोपट, मोर आणि कमळाची फुलं अशा पारंपारीक नक्षीकामाचा वापर केला जातो. साडीच्या काठावर सहसा नारळी डिझाईन्स असतात. (Irkal Paithani Silk Saree)
इरकल साडीची ओळख तिच्या पदरावरून होते. यामध्ये रेशमी धाग्यांचे वैशिष्ट्यपूर्ण डिझाईन्स असतात. इरकलचे काठ हे लाल किंवा मरून रंगाचे असतात आणि त्यांना गोमी असे म्हटलं जाते.
ही पैठणी सहसा भडक आणि गडद रंगांत उपलब्ध असते. जसं की पोपटी, जांभळा, मोरपिशी आणि शालूचा लाल रंग, साड्यांना धूप-छाव परिणाम देण्यासाठी दोन वेगवेगळ्या रंगाचे धागे वापरले जातात.
इरकल साड्यांमध्ये प्रामुख्यानं गडद निळा, हिरवा, गुलाबी आणि पिवळा, चिंतामणी रंग पाहायला मिळतो.
या साड्यांचे काठ नेहमी साडीच्या रंगांपेक्षा वेगळे असतात. ज्यामुळे त्या अधिक आकर्षक दिसतात.
या साड्या सुती, रेशमी किंवा दोन्हींच्या मिश्रणातून तयार केल्या जातात. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे साडीचे मुख्य अंग आणि पदर हे दोन वेगळ्या धाग्यांनी विणले जातात.
रेशमी साडी कधीही प्लास्टीकच्या पिशवीत ठेवू नका. त्याऐवजी सुती कापडात किंवा मलमलच्या कापडात गुंडाळून ठेवा.
साड्यांना अधूनमधून सावलीत किंवा कपाटाबाहेर काढून हवा द्यावी. मात्र साडी थेड कडक उन्हात टाकू नका. यामुळे रंग फिका पडू शकतो.
या साड्या लग्नसमारंभांसाठी तसंच खास प्रसंगांसाठी एक उत्तम पर्याय आहे. या साड्यांवर तुम्ही पारंपारीक मराठमोळे दागिने घालू शकता.
या साडीत तुम्हाला बरेच वेगवेगळे रंगांचे कॉम्बिनेशन्स मिळतील. जे कोणत्याही स्कीन टोन वर उठून दिसतील.