बच्चन कुटुंबीयांकडे सोन्याचं भांडार! अमिताभ की जया, कोणाकडे आहे सर्वात जास्त दागिने? आकडा पाहून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 10:29 IST2026-05-12T10:29:00+5:302026-05-12T10:29:15+5:30

अमिताभ बच्चन यांच्या संपत्तीचा आकडा वाचून चक्रावून जाल!

Amitabh Bachchan jaya Bachchan Gold Jewelry Net Worth | बच्चन कुटुंबीयांकडे सोन्याचं भांडार! अमिताभ की जया, कोणाकडे आहे सर्वात जास्त दागिने? आकडा पाहून व्हाल थक्क!

बच्चन कुटुंबीयांकडे सोन्याचं भांडार! अमिताभ की जया, कोणाकडे आहे सर्वात जास्त दागिने? आकडा पाहून व्हाल थक्क!

बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी जया बच्चन हे चित्रपटसृष्टीतील सर्वात श्रीमंत आणि प्रतिष्ठित जोडप्यांपैकी एक आहेत.  अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या अफाट संपत्तीचा आकडा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. चित्रपट, जाहिराती आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून त्यांनी मोठी संपत्ती उभी केली आहे. मात्र, नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, बच्चन कुटुंबीयांकडे असलेल्या सोन्या-हिऱ्यांच्या दागिन्यांची किंमत पाहून सामान्यांचेच नव्हे, तर मोठ्या उद्योगपतींचेही डोळे विस्फारतील.

२०२४ च्या राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना जया बच्चन यांनी आपल्या मालमत्तेचा तपशील दिला होता. या प्रतिज्ञापत्रातून बच्चन दांपत्याच्या दागिन्यांची अधिकृत माहिती समोर आली आहे. जया बच्चन यांच्याकडे ४०.९७ कोटी रुपयांचे सोन्याचे आणि हिऱ्यांचे दागिने आहेत. अमिताभ बच्चन यांच्याकडे जया बच्चन यांच्यापेक्षाही जास्त म्हणजे ५४.७७ कोटी रुपयांचे दागिने आहेत. या दोघांच्या एकूण दागिन्यांची किंमत सुमारे ९५.७४ कोटी रुपयांच्या घरात आहे. 

विशेष म्हणजे, अमिताभ बच्चन यांच्या मुंबईतील 'जलसा' बंगल्यात सोन्याचे टॉयलेट आहे. अभिनेता विजय वर्माच्या २०१६ मध्ये अमिताभ यांच्या  'जलसा' बंगल्यात सोन्याचे टॉयलेटसोबतचा फोटो शेअर केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच  विदेश मुद्रा वाचवण्यासाठी देशातील नागरिकांना वर्षभर सोने खरेदी न करण्याचे आवाहन केले आहे. अशा काळात बच्चन कुटुंबीयांच्या जुन्या दागिन्यांची ही आकडेवारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

अमिताभ बच्चन वयाच्या ८३ व्या वर्षीही तितक्याच उत्साहाने कामात व्यस्त आहेत. 'कल्की २८९८ एडी'च्या पहिल्या भागात अमिताभ बच्चन यांनी साकारलेली अश्वत्थामाची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. ते या चित्रपटाचे खरे 'हीरो' मानले जात आहेत. 'कल्की २८९८ एडी'च्या दुसऱ्या भागाचे शूटिंग सुरू झाले असून, या चित्रपटाचा दुसरा भाग देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच रिभू दासगुप्ता दिग्दर्शित 'सेक्शन ८४' हा कोर्टरूम ड्रामा १९ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार असून यात निम्रत कौर आणि अभिषेक बॅनर्जी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Web Title : बच्चन परिवार का सोने का खजाना: किसके पास हैं ज़्यादा गहने?

Web Summary : अमिताभ और जया बच्चन के पास लगभग ₹95.74 करोड़ के सोने और हीरे के गहने हैं। अमिताभ के पास जया से ज़्यादा गहने हैं। सोना खरीदने पर अंकुश लगाने के आह्वान के बीच खबर फिर से सामने आई।

Web Title : Bachchan Family's Gold Trove: Who owns more jewelry?

Web Summary : Amitabh and Jaya Bachchan possess a staggering amount of gold and diamond jewelry, totaling approximately ₹95.74 crore. Amitabh owns more than Jaya. News resurfaces amid calls to curb gold buying.