"शब्दांत सांगता येणार नाही असा अनुभव..." पहाटे ३ वाजता महाकालच्या भस्म आरतीत तल्लीन तमन्ना भाटिया; पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 10:39 IST2026-05-12T10:38:38+5:302026-05-12T10:39:17+5:30

अभिनेत्री तमन्ना भाटियाने उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात पहाटे ३ वाजता होणाऱ्या भस्म आरतीला उपस्थिती लावली.

Tamannaah Bhatia Seeks Blessings At Mahakal Temple Takes Part In Bhasma Aarti Video | "शब्दांत सांगता येणार नाही असा अनुभव..." पहाटे ३ वाजता महाकालच्या भस्म आरतीत तल्लीन तमन्ना भाटिया; पाहा व्हिडीओ

"शब्दांत सांगता येणार नाही असा अनुभव..." पहाटे ३ वाजता महाकालच्या भस्म आरतीत तल्लीन तमन्ना भाटिया; पाहा व्हिडीओ

Tamannaah Bhatia : बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार भगवान महादेवाचे मोठे भक्त आहेत आणि ते अनेकदा आपली भक्ती व्यक्त करतात. त्यापैकी एक नाव म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया. नुकतंच तमन्नाने मंगळवारी (१२ मे २०२६) पहाटे उज्जैन येथील प्रसिद्ध श्री महाकालेश्वर मंदिराला भेट दिली. पहाटे ३ वाजता होणाऱ्या 'भस्म आरती'मध्ये ती सहभागी झाली होती.

तमन्नाने कपाळाला चंदन लावून सर्व भक्तांसोबत बसून महाकालची आरती केली. महाकालला जलाभिषेक केल्यानंतर तिने परंपरेनुसार नंदीच्या कानात आपली इच्छा व्यक्त केली. लाल रंगाच्या बनारसी साडीत तमन्नाचे रूप अत्यंत सात्विक आणि सुंदर दिसत होते. माध्यमांशी बोलताना तमन्ना भावुक झाली. ती म्हणाली, "जय श्री महाकाल! येथे येऊन खूप छान वाटत आहे. महाकालचे बोलावणे आल्याशिवाय येथे येता येत नाही. आज सर्वांसोबत भस्म आरती अनुभवण्याची संधी मिळाली, ती भावना मी शब्दांत वर्णन करू शकत नाही. मला खूप सकारात्मक ऊर्जा जाणवत आहे. सर्वांनी एकत्र बसून आरती पाहण्याचे ते दृश्य तुम्हाला जगात इतर कोठेही दिसणार नाही".

आगामी प्रोजेक्ट्स 
तमन्ना भाटिया सध्या अनेक मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. लवकरच ती ओडिला २ (Odela 2) या चित्रपटात ती एका शिवभक्ताची (अघोरी) भूमिका साकारत असल्याने तिची महाकाल भेट विशेष मानली जात आहे. तसेच ती प्रसिद्ध चित्रपट निर्माते व्ही. शांताराम यांच्या जीवनावर आधारित प्रोजेक्टमध्येही पाहायला मिळणार आहे.

Web Title : तमन्ना भाटिया ने 3 बजे महाकाल भस्म आरती में भाग लिया

Web Summary : अभिनेत्री तमन्ना भाटिया ने उज्जैन के महाकालेश्वर मंदिर में भाग लिया और सुबह 3 बजे भस्म आरती में भाग लिया। लाल बनारसी साड़ी में, उन्होंने जलाभिषेक किया और नंदी को अपनी इच्छा व्यक्त की, इस अनुभव को आध्यात्मिक रूप से आगे बढ़ने और शब्दों से परे बताया। वह ओडेला 2 में शिव भक्त के रूप में अपनी भूमिका के लिए तैयारी कर रही हैं।

Web Title : Tamannaah Bhatia Immersed in Mahakal Bhasma Aarti at 3 AM

Web Summary : Actress Tamannaah Bhatia visited Ujjain's Mahakaleshwar Temple and participated in the Bhasma Aarti at 3 AM. Dressed in a red Banarasi saree, she performed Jalabhishek and expressed her wishes to Nandi, describing the experience as spiritually moving and beyond words. She is preparing for her role as a Shiv devotee in Odela 2.