A, B की C, परफेक्ट ब्रा साईज माहिती नाही? सोपी ट्रिक- सेकंदात ओळखा तुमची परफेक्ट ब्रा साईज

Updated:May 12, 2026 21:00 IST2026-05-12T21:00:00+5:302026-05-12T21:00:02+5:30

How to know your correct bra cup size : Bra size calculator formula: परफेक्ट ब्रा कशी निवडायची पाहूया

A, B की C, परफेक्ट ब्रा साईज माहिती नाही? सोपी ट्रिक- सेकंदात ओळखा तुमची परफेक्ट ब्रा साईज

बहुतेक महिलांना आपल्या आयुष्यात कधी ना कधी ब्रा खरेदी करताना साईजबाबत मोठा गोंधळ होतो. साईज बरोबर असली तरी 'B' कप का 'C' कप असे प्रश्न नेहमी पडतात. चुकीची ब्रा घातल्याने पाठदुखी, खांद्यावर व्रण पडणे आणि स्तनांच्या स्नायूंना इजा होणे असे आरोग्याचे प्रश्नही पडतात. यामुळे परफक्टे फिटिंगसाठी फक्त नंबरच नाही तर कप साईज समजून घेणे महत्त्वाचे आहे. (Signs of wearing wrong bra size)

A, B की C, परफेक्ट ब्रा साईज माहिती नाही? सोपी ट्रिक- सेकंदात ओळखा तुमची परफेक्ट ब्रा साईज

परफेक्ट ब्रा साईजमुळे स्तनांचा आकाराचा आणि शरीराची ठेवण यांचा योग्य मेळ जमतो. अनेकदा आपण दुकानात जातो. अंदाजाने एखादा नंबर सांगतो, पण घरी आल्यावर लक्षात येते की ती खूप घट्ट आहे किंवा कपमध्ये जागा उरते. चुकीच्या साईजमुळे आपला कॉन्फिडन्स तर कमी होतोच, पण कपडेही शरीरावर नीट दिसत नाहीत. (Difference between band size and bust size)

A, B की C, परफेक्ट ब्रा साईज माहिती नाही? सोपी ट्रिक- सेकंदात ओळखा तुमची परफेक्ट ब्रा साईज

ब्रा साईजमध्ये दोन साईज असतात एक बँड साईज आणि दुसरी कप साईज. बँड साईज म्हणजे आपल्या छातीखालचा घेर आणि कप साईज म्हणजे स्तनांचा आकार. घरच्या घरी दोन्ही साईज टेपने कशी मोजायची याची सोपी पद्धत पाहूया.

A, B की C, परफेक्ट ब्रा साईज माहिती नाही? सोपी ट्रिक- सेकंदात ओळखा तुमची परफेक्ट ब्रा साईज

सर्वात आधी ताठ उभे राहून मेजरपट्टी आपल्या छातीखालच्या भागावर गुंडाळा. टेप जास्त घट्ट किंवा सैल नसावा. जर आपले माप सम संख्येत असेल तर ३०, ३२ किंवा ३४ तर तोच आपला बँड साईज आहे. जर आपले माप विषम संख्येत ३१, ३३, ३५ असं आले तर त्यात १ इंच मिळवून ती संख्या सम करा.

A, B की C, परफेक्ट ब्रा साईज माहिती नाही? सोपी ट्रिक- सेकंदात ओळखा तुमची परफेक्ट ब्रा साईज

बस्ट साईज मोजण्यासाठी टेप छातीच्या सर्वात उंच भागावरुन फिरवून घेर मोजा. हे माप घेताना टेप दाबू नका तो हलका ठेवा.

A, B की C, परफेक्ट ब्रा साईज माहिती नाही? सोपी ट्रिक- सेकंदात ओळखा तुमची परफेक्ट ब्रा साईज

आलेल्या बस्ट साईजमध्ये आणि बँड साईज यांची वजाबाकी करा. यांच्यात जो फरक पाहायला मिळेल त्यावरुन कप साईज ठरतो. 0 इंच फरक- AA कप, १ इंच फरक- A कप, २ इंच फरक- B कप, ३ इंच फरक- C कप, ४ इंच फरक- D कप, ५ इंच फरक- DD कप.

A, B की C, परफेक्ट ब्रा साईज माहिती नाही? सोपी ट्रिक- सेकंदात ओळखा तुमची परफेक्ट ब्रा साईज

म्हणजे असं की आपला बस्ट साईज ३४ इंच असेल आणि बँड साईज ३२ इंच असेल तर ३४-३२ = २ इंच फरक येतो. याचा अर्थ असा आपली परफेक्ट साईज ३२B ही आहे.