अधिक मासात जावयाला देण्यासाठी नव्या पद्धतीच्या सुंदर निरांजन, पाहा एकाहून एक देखणे ९ दिवे
Updated:May 13, 2026 10:24 IST2026-05-13T10:12:12+5:302026-05-13T10:24:48+5:30

अधिक मासात जावयाला अनारसे, बत्तासे असे वाण दिले जाते. त्या वाणाच्या ताटामध्ये एक निरांजन देखील असते. ती निरांजन लावायची आणि मग जावयाला वाण द्यायचे अशी प्रथा आहे. त्यामुळे सध्या महिलांमध्ये निरांजन खरेदी वाढली आहे.
अशी तांब्याची निरांजन लावून वात दिले जाते. दिप दान करण्याला या महिन्यात महत्त्व आहे. पण आता काळानुसार त्यात थोडा बदल झाला असून तांब्याच्या पारंपरिक धाटणीच्या निरांजनीऐवजी वेगवेगळ्या प्रकारच्या, नव्या पद्धतीच्या निरांजन किंवा दिवे दिले जात आहेत.
त्यामुळे सध्या बाजारात असे कित्येक आकर्षक पद्धतीचे दिवे आलेले आहेत.
चांदीची निरांजन जावयाला द्यायची असेल तर त्यात असे सुंदर डिझाईन्स मिळत आहेत. हा दिवा शो पीस म्हणूनही नंतर घरात ठेवता येऊ शकेल असाच आहे.
चांदीच्या निरांजनीमध्ये कमी वजनाची पण सुंदर डिझाईन असणारी निरांजन किंवा दिवा हवा असेल तर असे कित्येक पर्याय उपलब्ध आहेत.
पितळाच्या निरांजनीचेही कित्येक वेगवेगळे प्रकार बाजारात उपलब्ध असून अगदी ७०- ८० रुपयांपासून त्या मिळत आहेत.
हा एक अतिशय सुंदर दिवा पाहा.. सजावटीसाठीही तो खूप छान आहे.
सोलार निरांजन किंवा दिवा हा एक प्रकार सध्या खूप ट्रेंडिंग आहे. हा दिवा रांगोळीमध्ये, दिवाळीमध्ये सजावटीसाठी कुठेही सहज ठेवता येत असल्याने याची मागणीही वाढते आहे.
बजेट कमी असेल तर अशा पद्धतीची स्टीलची निरांजनही देऊ शकता.
व्हाईट मेटल किंवा ॲल्युमिनियमच्या निरांजनी किंवा दिवे दिसायला सुंदर असतात आणि त्यांची किंमतही कमी असते. त्यामुळे त्यांच्यातले असे डिझाईन्स किंवा इतरही वेगवेगळे प्रकार तुम्ही पाहू शकता.