सहा वेळा पत्नीला कॅन्सर झाला, पण साथ नाही सोडली! 'फॅमिली मॅन' अभिनेत्याची डोळ्यांत पाणी आणणारी कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 10:28 IST2026-05-13T10:27:12+5:302026-05-13T10:28:19+5:30
अभिनेता शारिब त्याच्या कलाकृतींमधून प्रेक्षकांना खळखळून हसवत असला सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील एका घटनेमुळे त्याने अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणलंय. अलीकडेच एका मुलाखतीत शारिबने त्याची पत्नी नसरीन हाशमी हिच्या कॅन्सरच्या संघर्षाबद्दल खुलासा केला.

सहा वेळा पत्नीला कॅन्सर झाला, पण साथ नाही सोडली! 'फॅमिली मॅन' अभिनेत्याची डोळ्यांत पाणी आणणारी कहाणी
'द फॅमिली मॅन' मालिकेतील जेके तळपदे या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता शारिब हाशमी अनेकांचा आवडता अभिनेता. शारिब त्याच्या कलाकृतींमधून प्रेक्षकांना खळखळून हसवत असला सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील एका घटनेमुळे त्याने अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणलंय. अलीकडेच एका मुलाखतीत शारिबने त्याची पत्नी नसरीन हाशमी हिच्या कॅन्सरच्या संघर्षाबद्दल खुलासा केला.
नसरीन २०१८ पासून तोंडाच्या कॅन्सरशी झुंज देत असून आतापर्यंत तिच्यावर पाच वेळा शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. हा गंभीर आजारावर पाच वेळा उपचार होऊनही सहाव्यांदा पुन्हा नसरीन कॅन्सरशी लढा देत आहे, असा भावुक खुलासा शारिबने केला.
या कठीण काळात शारिब पत्नीच्या मागे खंबीरपणे उभा राहिला. नसरीनने शारिबचे कौतुक करताना सांगितले की, तो प्रत्येक वेळी सावलीसारखा तिच्यासोबत उभा राहिला. शूटिंगमध्ये कितीही व्यस्त असला तरी शारिब दररोज हॉस्पिटलमध्ये जायचा. याशिवाय पत्नीला डिस्चार्ज मिळेपर्यंत तो आपले सामान घेऊन तिथेच असायचा. शारिबने केवळ आजारपणातच नव्हे, तर त्याच्या स्ट्रगलच्या दिवसात पत्नीने जो पाठिंबा दिला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
अभिनयात करिअर करण्यासाठी जेव्हा शारिबने नोकरी सोडली होती, तेव्हा नसरीनने त्याला खंबीर साथ दिली. दोघांनाही जेव्हा संसारात आर्थिक समस्या जाणवू लागली तेव्हा नसरीनने आपले दागिने विकले. याशिवाय शारिबला अभिनय क्षेत्रात प्रयत्न करता यावेत म्हणून राहते घर विकतानाही तिने कोणतीही तक्रार केली नाही.
शारिब आणि नसरीन यांचं लग्न
शारिब आणि नसरीन यांनी २००३ मध्ये लग्न केलं असून त्यांना दोन मुले आहेत. शाहरुख खानसोबत 'जब तक है जान' चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या शारिबने आजवर 'तरला' आणि 'जरा हटके जरा बचके' यांसारख्या अनेक चित्रपटांत आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. द फॅमिली मॅन वेबसीरिजमधून शारिबवा खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. शारिबची पत्नी कॅन्सरवर मात करुन दोघांच्या आयुष्यात पुन्हा आनंद निर्माण होईल अशी चाहत्यांना आशा आहे.