"तुझ्यामुळे तिचा संसार मोडला...", बॉलिवूड अभिनेत्रीमुळे मौनी रॉयचा घटस्फोट? चाहत्यांनी धरलं जबाबदार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 15:57 IST2026-05-13T15:51:38+5:302026-05-13T15:57:43+5:30
मौनी आणि सूरजच्या घटस्फोटासाठी चाहत्यांनी बॉलिवूड अभिनेत्रीला जबाबदार धरलं आहे.

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉयच्या संसारात वादळ आलं आहे. मौनी तिचा पती सूरज नांबियारपासून वेगळी झाली असून त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू आहेत.

लग्नानंतर ४ वर्षांतच मौनी आणि सूरज एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. सूरजने मौनीला फसवल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

मौनी आणि सूरजच्या घटस्फोटासाठी चाहत्यांनी मौनीची बेस्ट फ्रेंड आणि बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीला जबाबदार धरलं आहे.

मौनीच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू असतानाच दिशा पटानीने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट करत दिशा पटानीमुळेच मौनीचा संसार मोडल्याचं म्हटलं आहे.

"मौनीचा घटस्फोट केलास", "मौनीचा संसार मोडून कसं वाटतंय?", "तुझ्यासोबत राहिल्यामुळेच मौनीने घटस्फोट घेतला", अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत.

"तुझ्यामुळेच मौनी आणि सूरजमध्ये भांडण झालं", अशी कमेंटही एका चाहत्याने केली आहे.

मौनी आणि सूरज यांच्यासोबत अनेकदा दिशा पटानीही दिसायची. त्यामुळेच चाहत्यांनी दिशाला मौनी-सूरजच्या घटस्फोटासाठी जबाबदार धरत आहेत.

















