'या' महिला लवकर वयस्कर दिसायला लागतात, कमी वयातच जातो चेहऱ्यावरचा ग्लो, कारण....

Updated:May 13, 2026 16:31 IST2026-05-13T16:27:10+5:302026-05-13T16:31:59+5:30

'या' महिला लवकर वयस्कर दिसायला लागतात, कमी वयातच जातो चेहऱ्यावरचा ग्लो, कारण....

त्वचेचं सौंदर्य टिकवून ठेवायचं असेल तर काही गोष्टी नियमितपणे पाळल्याच पाहिजेत. नाहीतर मग तुम्ही कमी वयातच वयस्कर दिसू लागता. या गोष्टी नेमक्या कोणत्या ते पाहुया...

'या' महिला लवकर वयस्कर दिसायला लागतात, कमी वयातच जातो चेहऱ्यावरचा ग्लो, कारण....

सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्या महिला कमी पाणी पितात त्यांना डिहायड्रेशनचा त्रास होतो. त्याचा परिणाम त्वचेवरही होतो आणि त्वचा कोरडी दिसू लागते. अशा महिलांच्या त्वचेवर लवकर सुरकुत्या येतात आणि चेहरा निस्तेज दिसतो.

'या' महिला लवकर वयस्कर दिसायला लागतात, कमी वयातच जातो चेहऱ्यावरचा ग्लो, कारण....

सतत चिंता करत बसणाऱ्या महिलाही मानसिक आणि शारिरीक दृष्ट्या लवकर थकून जातात. चिंता करत बसण्याच्या सवयीचा वाईट परिणाम आरोग्यावर होतो. त्यामुळे चिंता करत बसणं कमी करा. आनंदी राहा.

'या' महिला लवकर वयस्कर दिसायला लागतात, कमी वयातच जातो चेहऱ्यावरचा ग्लो, कारण....

जंकफूड, गोड पदार्थ जास्त खाणाऱ्या महिलांचा चेहरा सुजलेला दिसतो. डोळ्यांखाली काळी वर्तुळं आणि त्वचेवर पॅचेस येऊ लागतात.

'या' महिला लवकर वयस्कर दिसायला लागतात, कमी वयातच जातो चेहऱ्यावरचा ग्लो, कारण....

जे लोक कमी झोपतात त्यांच्या शरीरातलं हार्मोन्सचं संतुलन बिघडतं. पचनक्रिया आणि चयापचय क्रियाही बिघडतात. डोळ्यांखाली काळी वर्तुळं आणि सुरकुत्या वाढायला लागतात. त्यामुळे रोज पुरेशी झोप घेणं खूप गरजेचं आहे.

'या' महिला लवकर वयस्कर दिसायला लागतात, कमी वयातच जातो चेहऱ्यावरचा ग्लो, कारण....

ज्या महिला काहीच व्यायाम करत नाहीत त्यांना वजन वाढीचा त्रास तर होतोच, पण शरीरही लवकर थकतं. त्यांचा फिटनेस खूप कमी असल्याने वयाच्या आधीच त्यांना वेगवेगळे त्रास सुरू होतात.