मऊ, जाळीदार ढोकळा करण्यासाठी इनो, सोडा कधी घालावा? सोपं सिक्रेट, परफेक्ट होईल ढोकळा
Updated:May 13, 2026 17:22 IST2026-05-13T17:07:45+5:302026-05-13T17:22:09+5:30
Right Way To Make Dhokla At Home : बॅटर डब्यात ओतण्यापूर्वी स्टीमरमधील पाण्यात चांगली उकळी आलेली असावी.

ढोकळा मऊ आणि जाळीदार होण्यासाठी ढोकळ्याचं पाणी जास्त पातळ करू नका. ते पळीतून सहज पडेल असं असावं. (Right Way To Make Dhokla At Home)
पिठात आंबटपणा आणण्यासाठी ताजं दही किंवा लिंबू सत्व नक्की घाला. यामुळे सोडा सक्रिय होण्यास मदत होते. (How To Make Soft dhokla)
पिठात थोडं तेल घातल्यानं ढोकळा घशात कोरडा लागत नाही आणि आतून मऊ राहतो.
ढोकळा मऊ आणि जाळीदार होण्यासाठी बेकींग सोडा किंवा इनो नेहमी शेवटी म्हणजे बॅटर स्टिमरमध्ये ठेवण्यापूर्वी १ मिनिट आधी घालावा.
इनो किंवा सोडा घातल्यानंतर पीठ एकाच दिशेनं फक्त १० ते १४ सेकंद फेटावे. जेणेकरून त्यात हवा भरली जाईल.
पीठ फुगून वर आले की लगेच फेटणं थांबवा. जास्त फेटल्यामुळे त्यातील हवा निघून जाईल आणि ढोकळा चपटा होईल.
बॅटर डब्यात ओतण्यापूर्वी स्टीमरमधील पाण्यात चांगली उकळी आलेली असावी.
सुरूवातीचा १० मिनिटं ढोकळा मोठ्या आचेवर शिजवावा. जेणेकरून तो चांगला फुलतो.
ढोकळा शिजल्यानंतर त्यावर मोहोरी, कढीपत्ता आणि साखर-पाण्याची फोडणी दिसल्यास तो अधिक रसरशीत आणि स्पंजी होतो.