साडी, नथ अन् कपाळावर टिकली! कान्समध्ये आलिया भटचा देसी लूक, फोटो बघाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 17:06 IST2026-05-13T17:01:42+5:302026-05-13T17:06:04+5:30
कान्समध्ये आलिया भटचा जलवा बघायला मिळाला. तिच्या सौंदर्याचं खूप कौतुक होतं आहे.

१२ मे २०२६ रोजी बहुचर्चित आंतरराष्ट्रीय कान्स फिल्म फेस्टिव्हल (Cannes Film Festival) ला दिमाखात सुरुवात झाली. बॉलिवूडची 'बार्बी गर्ल' आलिया भट 'कान्स'मध्ये सहभागी झाली आहे.

एकापेक्षा एक सुंदर लूकमधून आलिया आपल्या सौंदर्याची मोहिनी घालते आहे. आलियाचा कान्समधला तिचा तिसरा लूकही व्हायरल झाला आहे.

आलियाच्या पारंपारिक आणि आधुनिकतेचा मिलाफ असलेल्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

आलियाने इंडिया पॅव्हेलियनसाठी आयव्हरी रंगाच्या साडीची निवड केली होती.

पारंपारिक ब्लाउजऐवजी तिने 'कोटा' शैलीतील ब्लाउज परिधान केला होता, ज्यामुळे तिच्या लूकला आधुनिक टच मिळाला.

भडक मेकअप टाळून आलियाने अत्यंत साध्या लूकमध्ये आपली उपस्थिती दर्शवली. कपाळावरील लहान टिकली आणि नाकातील नथीमुळे तिचा लूक अधिकच उठून दिसला.

या कार्यक्रमात आलियासोबत प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर देखील उपस्थित होते. या दोघांनी मिळून ५७ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (IFFI) अधिकृत पोस्टर आणि 'क्रिएटीव्ह व्हिजन' लाँच केले.

आलिया भटने गेल्या वर्षीच कान्समध्ये पदार्पण केलं होतं. तिच्या लूकचं तेव्हाही कौतुक झालं होतं आणि यंदाही तिचा लूक चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे.

आलियाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती लवकरच 'लव्ह अँड वॉर' आणि 'अल्फा' यांसारख्या मोठ्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

















