'Ragini MMS 3' मधून तमन्ना भाटियाचा पत्ता कट?;'या' प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं रिप्लेस, आयुष शर्मासोबत झळकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 16:46 IST2026-05-13T16:43:33+5:302026-05-13T16:46:51+5:30

खरं की काय? 'Ragini MMS 3' मधून तमन्ना भाटियाचा पत्ता कट, आता ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री साकारणार भूमिका

not tamannah bhatia actress nargis fakhri and aayush sharma pair in ragini mms 3 movie | 'Ragini MMS 3' मधून तमन्ना भाटियाचा पत्ता कट?;'या' प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं रिप्लेस, आयुष शर्मासोबत झळकणार

'Ragini MMS 3' मधून तमन्ना भाटियाचा पत्ता कट?;'या' प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं रिप्लेस, आयुष शर्मासोबत झळकणार

Ragini MMS 3 Update: आजकाल बॉलिवूडमध्ये वेगवेगळ्या विषयांवर आधारित सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हॉरर कॉमेडी असो किंवा सस्पेन्स थ्रिलर, रोमॅन्टिक सिनेमा प्रत्येक जॉनरच्या सिनेमाला प्रेक्षक चांगला प्रतिसाद देताना दिसत आहेत.दरम्यान, 'रागिणी एमएमएस' ही लोकप्रिय फ्रँचायझी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.२०११ मध्ये या सिनेमाचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. त्यानंतर सनी लिओनीची मुख्य भूमिका असलेला 'रागिणी एमएमएस २' हा चित्रपट प्रदर्शित झाला. आता, या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच तयार करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.त्यात आता चित्रपटाच्या कास्टिंगबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

एकता कपूरच्या या फ्रँचायझीबद्दल सध्या इंडस्ट्रीत चांगलीच चर्चा आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटात सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मासोबततमन्ना भाटिया मुख्य अभिनेत्री म्हणून झळकणार असल्याचं वृत्त समोर आलं होतं.
याबाबत एक महत्वाची माहिती मिळते आहे.

तमन्ना भाटियाचा चित्रपटातून पत्ता कट?

या चित्रपटात तमन्ना भाटिया आयुष शर्मासोबत रोमान्स करताना दिसणार होती, परंतु  कथानकात मोठा बदल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, रागिणी’ फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागात अभिनेत्री तमन्ना भाटियाचा पत्ता कट करण्यात आला असून तिच्या जागी अभिनेत्री नर्गिस फाखरीला कास्ट करण्यात आलं आहे.या प्रोजेक्टच्या निमित्ताने नर्गिस फाखरी पहिल्यांदाच आयुष शर्मासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. दरम्यान, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Web Title : रागिनी एमएमएस 3 से तमन्ना भाटिया बाहर; नरगिस फाखरी ने किया रिप्लेस

Web Summary : खबर है कि तमन्ना भाटिया 'रागिनी एमएमएस 3' से बाहर हो गई हैं। नरगिस फाखरी को आयुष शर्मा के साथ लिया गया है। आधिकारिक घोषणा का इंतजार है।

Web Title : Tamannaah Bhatia out of Ragini MMS 3; Nargis Fakhri replaces her

Web Summary : Tamannaah Bhatia is reportedly out of 'Ragini MMS 3'. Nargis Fakhri has been cast opposite Ayush Sharma. An official announcement is awaited.