मुख्यमंत्री थलापती विजय यांचं नाव घेताच 'अशी' होती रजनीकांत यांची प्रतिक्रिया; व्हिडीओ चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 16:04 IST2026-05-13T15:58:11+5:302026-05-13T16:04:40+5:30

विजय यांच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्तीनंतर आता अभिनेते रजनीकांत यांचा व्हिडीओ समोर आला आहे.

Rajinikanth Reacts With A Smile When Asked About Vijay Becoming Tamil Nadu Chief Minister Video | मुख्यमंत्री थलापती विजय यांचं नाव घेताच 'अशी' होती रजनीकांत यांची प्रतिक्रिया; व्हिडीओ चर्चेत

मुख्यमंत्री थलापती विजय यांचं नाव घेताच 'अशी' होती रजनीकांत यांची प्रतिक्रिया; व्हिडीओ चर्चेत

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार थलापती विजय यांनी आता राजकारणातही आपला दबदबा निर्माण केला आहे. नुकत्याच झालेल्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत त्यांच्या टीव्हीके (TVK) पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवत सत्ता काबीज केली आहे. १० मे रोजी चेन्नईतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर विजय यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. विजय यांच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्तीनंतर आता अभिनेते रजनीकांत यांचा व्हिडीओ समोर आला आहे.

सुपरस्टार रजनीकांत १२ मे रोजी चेन्नई विमानतळावर दिसले. पत्रकारांनी त्यांना विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत प्रश्न विचारला असता, रजनीकांत यांनी कोणतीही शाब्दिक प्रतिक्रिया न देता केवळ हसून हात जोडले आणि ते पुढे निघून गेले. रजनीकांत यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

रजनीकांत यांनी आधीच केलं होतं अभिनंदन
विमानतळावर मौन बाळगले असले तरी, ४ मे रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावर रजनीकांत यांनी विजय यांचे सोशल मीडियावरून अभिनंदन केले होते. "तामिळनाडू विधानसभा निवडणुकीतील दणदणीत विजयाबद्दल टीव्हीके अध्यक्ष विजय आणि त्यांच्या पक्षाच्या सर्व सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन" असे पत्र त्यांनी प्रसिद्ध केले होते.

विजय यांच्या 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) पक्षाने पहिल्याच विधानसभा निवडणुकीत १०८ जागा जिंकून राजकीय विश्लेषकांना थक्क केले आहे. मुख्यमंत्री म्हणून आपल्या पहिल्याच भाषणात विजय यांनी जनतेला भावनिक साद घातली. "मी पैसे कमावण्यासाठी राजकारणात आलेलो नाही. सार्वजनिक निधीचा कधीही गैरवापर होणार नाही, याचे आश्वासन मी जनतेला देतो" असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले.

Web Title : विजय के मुख्यमंत्री बनने पर रजनीकांत की प्रतिक्रिया वायरल।

Web Summary : विजय के मुख्यमंत्री बनने पर रजनीकांत मुस्कुराए और हाथ जोड़े। इससे पहले, उन्होंने विजय की टीवीके पार्टी को तमिलनाडु चुनाव जीतने पर बधाई दी थी। विजय ने अपने पहले चुनाव में 108 सीटें हासिल कीं।

Web Title : Rajinikanth's reaction to Vijay becoming CM goes viral.

Web Summary : Rajinikanth smiled and folded his hands when asked about Vijay's CM appointment. Earlier, he congratulated Vijay's TVK party for winning the Tamil Nadu election. Vijay secured 108 seats in his first election.