'आदिपुरुष'च्या ट्रोलिंगनंतर आता सैफ अली खानने 'रामायण'वर दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 16:31 IST2026-05-14T16:30:56+5:302026-05-14T16:31:32+5:30

रणबीर कपूरच्या 'रामायण'बद्दल काय म्हणाला सैफ अली खान?

saif ali khan reacts on ramayan movie after experiencing trolling of adipurush | 'आदिपुरुष'च्या ट्रोलिंगनंतर आता सैफ अली खानने 'रामायण'वर दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

'आदिपुरुष'च्या ट्रोलिंगनंतर आता सैफ अली खानने 'रामायण'वर दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

अभिनेता सैफ अली खान सध्या त्याच्या आगामी ‘कर्तव्य’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे, ज्यात तो एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, एका मुलाखतीत त्याने रणबीर कपूरच्या आगामी ‘रामायण’ चित्रपटावर भाष्य केले असून आपल्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या अपयशावरही मोकळेपणाने मत मांडले आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ हा चित्रपट अत्यंत खास ठरणार असून प्रेक्षक तो पाहण्यासाठी उत्सुक असतील, अशी भावना सैफने व्यक्त केली आहे.

अमर उजालाला दिलेल्या मुलाखतीत सैफ म्हणाला, "रामायण लोकांच्या अत्यंत जवळचं आहे. रामायण आधीही बनलं आहे आणि यापुढेही बनत राहील. मला असं वाटतं की हा नवीन रामायण चित्रपट खूप खास असेल. मी रणबीर कपूर, यश, दिग्दर्शक आणि संपूर्ण क्रू ला शुभेच्छा देतो. कारण मला वाटतं हा सिनेमा खूप चांगला बनला असणार आणि लोकही सिनेमा पाहण्यासाठी खूप उत्साहित असणार."

तो पुढे म्हणाला, "भारतीय संस्कृतीत अनेक ऐतिहासिक आणि पौराणिक कथा आहेत, ज्या अत्याधुनिक स्पेशल इफेक्ट्सचा वापर करून सुंदर पद्धतीने पडद्यावर मांडता येऊ शकतात."

सैफने स्वतः २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आदिपुरुष’ चित्रपटात 'लंकेश'ची भूमिका साकारली होती. ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटात प्रभास आणि कृती सेनॉन मुख्य भूमिकेत होते. मात्र रिलीजनंतर या चित्रपटातील संवाद, व्हीएफएक्स (VFX) आणि पात्रांच्या लूकवरून सोशल मीडियावर प्रचंड टीका आणि ट्रोलिंग झाली होती. विशेषतः व्हीएफएक्सच्या दर्जावर प्रेक्षकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

‘आदिपुरुष’ला मिळालेल्या नकारात्मक प्रतिसादानंतर आता बॉलिवूड पौराणिक चित्रपट बनवताना अधिक खबरदारी घेत असल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’कडून प्रेक्षकांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. सैफने व्यक्त केलेल्या विश्वासामुळे या आगामी चित्रपटाबाबतची उत्सुकता आता अधिकच वाढली आहे.

Web Title : 'आदिपुरुष' ट्रोलिंग के बाद सैफ अली खान की 'रामायण' पर प्रतिक्रिया।

Web Summary : सैफ अली खान ने अपनी आगामी फिल्म 'कर्तव्य' के बीच रणबीर कपूर की 'रामायण' पर टिप्पणी की, 'आदिपुरुष' की आलोचना के बाद आशावाद व्यक्त किया। उनका मानना है कि नई फिल्म खास होगी, टीम को शुभकामनाएं दीं। सैफ ने उन्नत वीएफएक्स के साथ भारतीय पौराणिक कथाओं को चित्रित करने की क्षमता पर जोर दिया।

Web Title : Saif Ali Khan reacts to 'Ramayana' after 'Adipurush' trolling.

Web Summary : Saif Ali Khan, amidst his upcoming film 'Kartavya', commented on Ranbir Kapoor's 'Ramayana,' expressing optimism after 'Adipurush' backlash. He believes the new film will be special, wishing the team success. Saif emphasized the potential of portraying Indian mythological stories with advanced VFX.