Virat Kohli funny video viral KKR vs RCB IPL 2026: रनमशिन विराट कोहलीच्या दमदार शतकाच्या जोरावर RCB ने कोलकाताचा ६ गडी राखून पराभव केला. KKR ने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १९२ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूने ५ चेंडू राखून विजय मिळवला. विराट कोहली आधीच्या दोन सामन्यात शून्यावर बाद झाला होता. त्यामुळे सुरुवातीला त्याने पहिली धाव घेतल्यावर ती धाव साजरी केली. त्यानंतर दमदार फलंदाजी करत ६० चेंडूत नाबाद १०५ धावा केल्या. विराटच्या खेळीचे साऱ्यांनी तोंडभरून कौतुक केले. तशातच त्याचा एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
विराट कोहली कोलकाता नाइट रायडर्स विरूद्धच्या सामन्यात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला. तो फलंदाजीला आला तेव्हापासूनच तो प्रचंड उत्साहात असल्याचे दिसून आले. आधीच्या दोन सामन्यात त्याला भोपळाही फोडता आला नव्हता, त्यामुळे या सामन्यात धावा काढण्यासाठी तो आतूर झाला होता. त्यानुसार फलंदाजीला येताच विराट कोहली मैदानात विविध फटकेबाजीचा सराव करत होता. त्यावेळी तो म्हणताना दिसला की, आता मला टीम इंडियासाठी खेळायचं नाहीये, त्यामुळे आता मी वाकडे-तिकडे फटकेही खेळू शकतो. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. चाहते यावर कमेंट करत आहेत. पाहा व्हिडीओ-
दरम्यान, सामन्यात विराट कोहलीने एकहाती सत्ता गाजवली. कोलकाता नाईट रायडर्सकडून अंगक्रिश रघुवंशीने ४६ चेंडूत ७१ धावांची खेळी केली. पण विराटच्या शतकापुढे सारे फिके पडले. विराट गेल्या दोन सामन्यात शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर त्याने ६० चेंडूत ११ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद १०५ धावा कुटल्या. या विजयामुळे RCB ने १२ पैकी ८ सामने जिंकून १६ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.