अक्षय खन्नाच्या 'महाकाली' मध्ये 'या' लोकप्रिय अभिनेत्याची एन्ट्री; काय असणार भूमिका? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 17:40 IST2026-05-14T17:35:39+5:302026-05-14T17:40:10+5:30

बहुचर्चित 'Mahakali' सिनेमात बॉलिवूडच्या हॅण्डसम हंकची लागली वर्णी, अक्षय खन्नाला देणार टक्कर

actor rohit saraf joins cast of prashant verma upcoming mahakali movie share screen with akshaye khanna | अक्षय खन्नाच्या 'महाकाली' मध्ये 'या' लोकप्रिय अभिनेत्याची एन्ट्री; काय असणार भूमिका? जाणून घ्या

अक्षय खन्नाच्या 'महाकाली' मध्ये 'या' लोकप्रिय अभिनेत्याची एन्ट्री; काय असणार भूमिका? जाणून घ्या

Mahakali Movie Update: गाजलेल्या ‘हनुमान’ सिनेमाचे दिग्दर्शक प्रशांत वर्मा पुन्हा एकदा त्यांच्या नव्या चित्रपटाच्या माध्यमातून बॉक्स ऑफिसवर लोकांची मनं जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत. सध्या ते त्यांच्या आगामी 'महाकाली' या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहेत. अलिकडेच चित्रपटाच्या निर्मात्यांनी अक्षय खन्नाच्या व्यक्तिरेखेचा पहिला लूक रिलीज केला.  चित्रपटात अक्षय खन्ना असुरगुरु शुक्राचार्य यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सुरू असून, यात दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील इतरही दिग्गज कलाकार दिसणार आहेत. अशातच 'महाकाली' सिनेमाच्या कास्टिंगबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

दरम्यान,'महाकाली' बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपटात आणखी एका बॉलिवूड अभिनेत्याची वर्णी लागली आहे. कोण आहे हा अभिनेता? जाणून घेऊया... 

मिडिया रिपोर्टनुसार, हिंदी सिनेसृष्टीतील हॅंडसम हंक अभिनेता रोहित सराफ या चित्रपटात दिसणार आहे. 'महाकाली' या या पौराणिक चित्रपटात रोहित एक महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.  त्याच्या या भूमिकेबद्दल कोणतीही अपडेट देण्यात आलेली नाही.  या चित्रपटाद्वारे तो तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, रोहितने हैदराबादमध्ये 'महाकाली'च्या चित्रीकरणाला सुरुवात देखील केली आहे. दरम्यान, चित्रपटात अक्षय खन्ना आणि भूमि शेट्टी हे देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. या दोन्ही कलाकारांचे फर्स्ट लुक यापूर्वीच समोर आले असून, आता रोहित चित्रपटात कोणत्या भूमिकेत दिसणार?  हे जाणून घेण्यास प्रेक्षक देखील उत्सुक झाले आहेत.

‘महाकाली’ची निर्मिती आरके दुग्गल आणि रिवाज रमेश दुग्गल हे आरकेडी स्टुडिओजच्या बॅनरखाली करत आहेत. हा चित्रपट प्रशांत वर्मा यांच्या सिनेमॅटिक युनिव्हर्सचा भाग आहे, त्यामुळे सिनेरसिकांच्या लक्ष या प्रोजेक्टकडे लागून राहिलं आहे.

वर्कफ्रंट 

अभिनेता रोहित सराफच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास, अलिकडेच तो 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' या चित्रपटात दिसला आहे. या चित्रपटात रोहितसह वरुण धवन, जान्हवी कपूर आणि तान्या मल्होत्रा अशी स्टारकास्ट होती. आता रोहित लवकरच नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

Web Title : अक्षय खन्ना की 'महाकाली' में रोहित सराफ की एंट्री, भूमिका क्या होगी?

Web Summary : रोहित सराफ 'महाकाली' में अक्षय खन्ना के साथ, तेलुगु में डेब्यू करेंगे। हैदराबाद में शूटिंग शुरू। अक्षय खन्ना शुक्राचार्य और भूमि शेट्टी भी मुख्य भूमिका में। प्रशांत वर्मा द्वारा निर्देशित, 'महाकाली' आरकेडी स्टूडियोज द्वारा निर्मित है।

Web Title : Rohit Saraf joins Akshay Khanna in 'Mahakali'; Role revealed?

Web Summary : Rohit Saraf joins Akshay Khanna in 'Mahakali', marking his Telugu debut. He's already filming in Hyderabad. Akshay Khanna plays Shukracharya, with Bhumi Shetty also in key role. Directed by Prasanth Varma, 'Mahakali' is produced by RKD Studios.