तुला कोणीच ओळखलं नाही! ट्रोल करणाऱ्या युजरला आलिया भटने दिला रिप्लाय; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 17:09 IST2026-05-14T17:08:56+5:302026-05-14T17:09:30+5:30

गोड भाषेत उत्तर दिलं. काय म्हणाली आलिया भट?

alia bhatt savage reply to trollers targetting no one noticed her in cannes says you noticed | तुला कोणीच ओळखलं नाही! ट्रोल करणाऱ्या युजरला आलिया भटने दिला रिप्लाय; म्हणाली...

तुला कोणीच ओळखलं नाही! ट्रोल करणाऱ्या युजरला आलिया भटने दिला रिप्लाय; म्हणाली...

कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२६ मध्ये आपल्या सौंदर्याने आणि एकापेक्षा एक लूकने लक्ष वेधून घेणाऱ्या आलिया भटने आता ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे. कान्समध्ये तिच्याकडे फोटोग्राफर्सने दुर्लक्ष केलं, तिला कोणीच ओळखलं नाही अशी टीका सोशल मीडियावर झाली. एका युजरने आलियाच्या पोस्टवर तशी कमेंट केली तर आलियाने तिला गोड भाषेत उत्तर दिलं. काय म्हणाली आलिया भट?

 अभिनेत्री आलिया भट बऱ्याचदा ट्रोलिंगची शिकार झाली आहे. या ना त्या कारणाने तिला ट्रोल करण्यात आलं आहे. मात्र पहिल्यांदाच तिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर हँडलवरुन ट्रोल करणाऱ्या कमेंटला उत्तर दिलं आहे. कान्सच्या तिच्या एका पोस्टवर एका युजरने कमेंट करत लिहिले की, "किती दुर्दैवी गोष्ट आहे, कोणाचेच तुझ्याकडे लक्ष गेले नाही." यावर आलियाने चिडून न जाता अतिशय सभ्य भाषेत उत्तर दिले. तिने लिहिले, "दुर्दैवी का? तुझे तर माझ्याकडे लक्ष गेले ना." आलियाच्या या उत्तराने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून, नकारात्मकतेला शांतपणे कसं हाताळावं, याचे उत्तम उदाहरण तिने दिले आहे.

चाहत्यांनी आलियाच्या या प्रतिसादाचे भरभरून कौतुक केले असून तिने परिस्थितीला संयमाने हाताळल्याबद्दल तिची स्तुती केली आहे. कान्स महोत्सवाच्या सुरुवातीपासूनच आलिया तिच्या फॅशन चॉईस, मुलाखती आणि फोटोंमुळे सतत चर्चेत राहिली आहे. या एका उत्तराने तिने टीकाकारांचे तोंड तर बंद केलेच, पण चाहत्यांची मनेही पुन्हा एकदा जिंकली आहेत.

लिया भट्ट लवकरच 'अल्फा' या चित्रपटात दिसणार असून हा चित्रपट याच वर्षी जुलैमध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय तिच्याकडे संजय लीला भन्साळी यांचा 'लव्ह अँड वॉर' हा मोठा प्रोजेक्ट देखील आहे, ज्यामध्ये ती रणबीर कपूर आणि विकी कौशलसोबत स्क्रीन शेअर करताना दिसेल. हा चित्रपट जानेवारी २०२७ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

Web Title: alia bhatt savage reply to trollers targetting no one noticed her in cannes says you noticed