लग्नानंतर ६ वर्षांतच घटस्फोट, पत्नी करतेय लेकाचा सांभाळ, आता ४२व्या वर्षी दुसरं लग्न करणार अभिनेता?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 16:41 IST2026-05-14T16:41:12+5:302026-05-14T16:41:35+5:30
दलजीत कौरशी घटस्फोट घेतल्यानंतर शालिन सिंगल आहे. अद्याप त्याने दुसरं लग्न केलेलं नाही. आता ४२व्या वर्षी शालिन भनोट पुन्हा बोहल्यावर चढणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

लग्नानंतर ६ वर्षांतच घटस्फोट, पत्नी करतेय लेकाचा सांभाळ, आता ४२व्या वर्षी दुसरं लग्न करणार अभिनेता?
शालिन भनोट हा हिंदी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. करिअरसोबतच तो पर्सनल आयुष्यामुळेही तितकाच चर्चेत असतो. दलजीत कौरशी घटस्फोट घेतल्यानंतर शालिन सिंगल आहे. अद्याप त्याने दुसरं लग्न केलेलं नाही. आता ४२व्या वर्षी शालिन भनोट पुन्हा बोहल्यावर चढणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. शालीन या वर्षात दुसरं लग्न करत पुन्हा संसार थाटणार आहे, असं बोललं जात होतं. दुसऱ्या लग्नाबद्दल शालीनला विचारताच त्याने मुलाखतीत यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
४२व्या वर्षी पुन्हा लग्न करण्याच्या चर्चांवर शालिनने स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं. टेली मसालाला दिलेल्या मुलाखतीत शालिन म्हणाला, "कोण आहे ती मुलगी? प्लीज मला पण सांगा. या चर्चांमुळे मी हैराण झालो आहे. मला स्वत:ला माहीत नाही माझं लग्न कोणासोबत होतंय. या सगळ्या अफवा आहेत. आधी मुलगी तर भेटली पाहिजे. एक चांगली मुलगी माझ्या आयुष्यात येऊ दे अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. पण सध्या माझ्या आयुष्यात कोणीच नाहीये. माझं लक्ष फक्त कामावर आहे".
शालिन भनोटने २००९ मध्ये दलजीत कौरसोबत लग्न करत संसार थाटला होता. मात्र लग्नानंतर ६ वर्षांनी २०१५ मध्ये घटस्फोट घेत ते वेगळे झाले. त्यांना एक मुलगा आहे. दलजीत कौर एकटीने त्या मुलाचा सांभाळ करते. शालिनसोबत घटस्फोट घेतल्यानंतर दलजीतने दुसरं लग्न केलं होतं. मात्र तिचं ते लग्नही फार काळ टिकलं नाही.