पुणे : गेल्या सहा ते सात वर्षांपासून मी आणि माझ्या सोसायटीतील नागरिकांना स्वतःच्या पैशांने टँकर मागवून पाणी घ्यावे लागत आहे. समाविष्ट गावामध्ये नसूनही पाण्याच्या टाक्यांची कामे पूर्ण का होत नाहीत?” असा थेट सवाल उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी उपस्थित करत महापालिका प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. “घोटभर पाण्यासाठी वारंवार बैठका घेतल्या जातात. मात्र, ठोस तोडगा निघत नाही. आम्ही काय पाकिस्तानच्या सीमेवर राहतो का?” असा संतापही त्यांनी व्यक्त केला.
सर्वसाधारण सभेत पाणीटंचाईवर चर्चा सुरू असताना परशुराम वाडेकर यांनी आपल्या वक्तव्यात वैयक्तिक अनुभव मांडत परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित केले. “मी ज्या भागात राहतो त्या सोसायटीत गेल्या सात वर्षांपासून टँकरनेच पाणीपुरवठा केला जात आहे. शहराच्या उपमहापौरालाच टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. बोपोडी भागाला पाणीपुरवठा केला जात आहे. पूर्वी परिस्थिती अत्यंत बिकट होती. मात्र, गेल्या काही वर्षांत सातत्याने काम करून पुरवठा सुधारण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. येत्या २० दिवसांत याबाबत ठोस उपाययोजना करून कार्यवाही केली जाईल, असे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितले.
Web Summary : Pune's Deputy Mayor Parshuram Wadekar expressed outrage over persistent water scarcity. He questioned why water tank projects aren't completed, forcing residents to rely on tankers for years. He asked if they were living on the Pakistan border.
Web Summary : पुणे के उप महापौर परशुराम वाडेकर ने लगातार पानी की कमी पर नाराजगी व्यक्त की। उन्होंने सवाल किया कि पानी की टंकी परियोजनाएं क्यों पूरी नहीं हो रही हैं, जिससे निवासियों को वर्षों से टैंकरों पर निर्भर रहना पड़ रहा है। उन्होंने पूछा कि क्या वे पाकिस्तान सीमा पर रह रहे हैं।