Join us
Daily Top 2Weekly Top 5

Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा

IPL च्या इतिहासातील तिसरे सर्वात जलद शतक

By सुशांत जाधव | Updated: April 25, 2026 20:59 IST

Open in App

Vaibhav Suryavanshi Century : जयपूरच्या घरच्या मैदानात उत्तुंग फटकेबाजीचा नजराणा पेश करताना वैभव सूर्यवंशीनंसनरायझर्स हैदराबाद विरुद्ध यंदाच्या हंगामातील सर्वात जलद शतक झळकावले. १५ वर्षीय स्फोटक बॅटरनं ३६ व्या चेंडूवर षटकारासह शतकाला गवसणी घातली. आयपीएल स्पर्धेतील त्याच्या बॅटमधून आलेले हे दुसरे आणि IPL च्या इतिहासातील तिसरे सर्वात जलद  शतक ठरले. सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यातील साकिब हुसेन याने त्याच्या खेळीला ब्रेक लावला. वैभवनं या सामन्यात ३७ चेंडूत ५ चौकार आणि १२ षटकारांच्या मदतीने २७८.३६ च्या स्ट्राईक रेटनं १०३ धावांची खेळी केली.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

IPL च्या इतिहासातील जलद शतक; टॉप ३ मध्ये दोन वेळा वैभव सूर्यवंशीचं नाव 

IPL च्या इतिहासात सर्वात जलद शतकाचा विक्रम हा ख्रिस गेलच्या नावे आहे. २०१३ च्या हंगामात गेलनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे प्रतिनिधीत्व करताना पुणे वॉरियर्स विरुद्ध अवघ्या ३० चेंडूत शतक साजरे केले होते. त्यापाठोपाठ वैभव सूर्यवंशीचा नंबर लागतो. २०२५ पदार्पणाच्या हंगामात त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध फक्त ३५ चेंडूत शतक झळकावले होते. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध त्याने ३६ चेंडूत शतकी नजराणा पेश करत IPL इतिहासातील तिसरे जलद शतक नोंदवले.

४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी

 आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक झळकवणारे फलंदाज

  • क्रिस गेल ३० चेंडूत शतक- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध पुणे वॉरियर्स इंडिया (२०१३)
  • वैभव सूर्यवंशी ३५ चेंडूत शतक- राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात (२०२५)
  • वैभव सूर्यवंशी ३६ चेंडूत शतक- राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (२०२६)
  • युसूफ पठाण ३७ चेंडूत शतक- राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (२०१०)
  • हेन्री क्लासेन ३७ चेंडूत शतक- सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (२०२५) 
English
हिंदी सारांश
Web Title : Vaibhav Suryavanshi: 15-Year-Old Smashes Fastest Century in 36 Balls!

Web Summary : Vaibhav Suryavanshi, 15, hit a record-breaking 36-ball century against Sunrisers Hyderabad. This is the third-fastest IPL century, following Chris Gayle's record. He scored 103 runs with five fours and twelve sixes, showcasing explosive batting.
टॅग्स :आयपीएल २०२६राजस्थान रॉयल्ससनरायझर्स हैदराबादवैभव सूर्यवंशी