Karun Nair Drops Shreyas Iyer Twice In 5 Minutes Faces Heavy Trolling : 'डियर क्रिकेट गिव्ह मी वन चान्स' फेम करुण नायर गत हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून धमाकेदार फटकेबाजीचा नजरणा पेश करत टीम इंडियात आला अन् गेला. यंदाच्या हंगामात तो दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात असला तरी त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवण्याऐवजी इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपातच पसंती देण्यात येत आहे. पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात तो क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला अन् पाच मिनिटात त्याने श्रेयस अय्यरचे दोन झेल सोडत पंजाब किंग्सच्या विजयात हातभार लावला. या गोष्टीवरून सोशल मीडियावर तो ट्रोल होताना दिसत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दोन कॅचसह DC च्या हातून निसटली मॅच
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात आयपीएल २०२६ हंगामातील ३५ वा सामना दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात आला. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना केएल राहुलच्या १५२ (६७) विक्रमी खेळीसह नितीश राणाच्या ९१(४४) दमदार खेळीच्या पंजाब किंग्ससमोर विक्रमी २६५ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना वादळी खेळी करणाऱ्या प्रियांश आर्य ४३ (१७) आणि प्रभसिमरन सिंग ७६ (२६) यांची विकेट मिळवल्यावर दिल्लीसाठी सामन्यात परतण्याची संधी मिळाली. पण करुण नायरनं घोळ केला. त्याने श्रेयस अय्यरचे दोन झेल सोडले. हा सामन्याला कलाटणी देणारा क्षण ठरला.
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
करुण नायरनं एकच चूक दोन वेळा केली, अय्यरनं उचलला फायदा
विपराज निगम घेऊन आलेल्या १५ व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर पंजाब किंग्सचा कर्णधार अय्यर २० चेंडूंमध्ये २८ धावांवर फलंदाजी करत होता. एक मोठा फटका मारण्याचा त्याचा प्रयत्न फसला. पण लॉन्ग-ऑफला उभ्या असलेल्या करुण नायरने त्याचा सोपा झेल सोडला. १६ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर कुलदीप यादवनं पुन्हा श्रेयस अय्यरला आपल्या जाळ्यात फसवले. पण करुण नायरनं पुन्हा तीच चूक केली. पाच मिनिटे आणि तीन चेंडूत त्याने केलेल्या दोन चुकांची किंमत दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला पराभवासह चुकवावी लागली. ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे करुण नायरला नेटकरी ट्रोल करत आहेत.
'गिव्ह मी वन चान्स' फेम करुण नायर ट्रोल
करुण नायरनं पंजाब किंग्सला विक्रमी विजय मिळवून देण्यात हातभार लावला, अशा आशयाची चर्चा सोशल मीडियावर रंगताना दिसत आहे. एका नेटकऱ्याने तर पंजाब किग्सची सह मालकीण आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा हिचा ऑक्शन टेबलवरील फोटो शेअर करत तिने करुण नायरला मॅनेज केले आहे, अशी मजेशीर प्रतिक्रिया दिल्याचेही दिसते.
Web Summary : Karun Nair, famed for 'Give Me One Chance,' faced trolling after dropping Shreyas Iyer's catches twice during the DC vs PBKS match. His errors helped Punjab Kings win, sparking social media backlash. Delhi Capitals lost crucial moment.
Web Summary : 'गिव मी वन चांस' के लिए मशहूर करुण नायर श्रेयस अय्यर के कैच छोड़ने के बाद ट्रोल हुए। उनकी गलतियों से पंजाब किंग्स को जीत मिली, जिससे सोशल मीडिया पर प्रतिक्रिया हुई। दिल्ली कैपिटल्स ने महत्वपूर्ण पल खो दिया।