जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सचा १५ वर्षीय स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशी याने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध शतकी धमाका केला.
आयपीएल कारकिर्दीतील दुसरे आणि IPL इतिहासातील तिसरे जलद शतक झळकावताना त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली. एक नजर त्या खास रेकॉर्ड्सवर
शतकी खेळीत १२ उत्तुंग षटकार ठोकणाऱ्या वैभव सूर्यवंशीनं डावातील पहिल्या षटकात सर्वाधिक ४ षटकार मारण्याचा खास विक्रम आपल्या नावे केला.
यंदाच्या हंगामात तिसऱ्यांदा त्याने १५ चेंडूत अर्धशतक साजरे केले. तीन वेळा अशी कामगिरी करणारा तो एकमेव फलंदाज आहे.
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध वादळी शतकी खेळी करताना त्याने टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद १००० धावा करण्याचा विश्वविक्रम आपल्या नावे केला. त्याने फक्त ४७३ चेंडूत हा डाव साधला आहे.
आयपीएलच्या पदार्पणाच्या हंगामात ३५ चेंडूत शतक साजरे करणाऱ्या वैभव सूर्यवंशीनं यंदाच्या हंगामातील पहिले शतक फक्त ३६ चेंडूत साजरे केले.
टी-२० क्रिकेटमध्ये ४० पेक्षा कमी चेंडूत दोन शतके झळकवणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.