शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 22:15 IST

1 / 6
उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होताच पर्यटकांची पावले आपसूकच डोंगराळ भागांकडे वळतात. उत्तराखंडमधील मसुरी, नैनिताल किंवा औली ही ठिकाणे लोकप्रिय आहेतच, पण तिथे होणारी पर्यटकांची तुफान गर्दी कधीकधी मनस्ताप ठरते.
2 / 6
अशा वेळी तुम्हाला खऱ्या अर्थाने निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल, तर उत्तराखंडच्या गढवाल हिमालयात दडलेली 'हर की दून' ही व्हॅली तुमच्यासाठी एक परफेक्ट डेस्टिनेशन ठरू शकते. याला 'व्हॅली ऑफ गॉड्स' म्हणजेच देवांची दरी असेही म्हणतात.
3 / 6
समुद्रसपाटीपासून सुमारे ३,५०० मीटर उंचीवर वसलेली ही दरी अजूनही व्यावसायिक पर्यटनापासून दूर आहे. त्यामुळेच इथला निसर्ग आजही तितकाच शुद्ध आणि मनमोहक आहे. इथले हिरवेगार गालिचे, बर्फाच्छादित शिखरे आणि खळखळ वाहणाऱ्या नद्या पाहून असं वाटतं की वेळ जणू इथेच थांबली आहे.
4 / 6
या दरीचे मुख्य आकर्षण म्हणजे इथली जुनी लाकडी घरे आणि तिथली संस्कृती. इथल्या गावांमध्ये लोक आजही त्यांच्या प्राचीन परंपरा जपून आहेत. जर तुम्ही दिल्लीहून निघत असाल, तर सर्वात आधी बस किंवा ट्रेनने डेहराडूनला पोहोचावे लागेल. डेहराडूनवरून तुम्हाला 'सांकरी' गावापर्यंत बस किंवा टॅक्सीने जावे लागेल. हे या ट्रेकचे मुख्य केंद्र आहे.
5 / 6
सांकरीपासून या व्हॅलीचा प्रवास सुरू होतो. हा ट्रेक करताना तुम्हाला रस्त्यात अनेक सुंदर छोटी गावे, धबधबे आणि व्ह्यू पॉईंट्स पाहायला मिळतील. या दरीतील ओसला हे गाव अतिशय प्रसिद्ध आहे. इथली वास्तुकला आणि प्राचीन मंदिरे पाहण्यासारखी आहेत. जर तुम्हाला साहसाची आवड असेल, तर इथून जवळच असलेले जौंधार ग्लेशियर तुम्हाला मंत्रमुग्ध करेल. सांकरी ते तालुका हा प्रवास घनदाट जंगलातून होतो, जिथे तुम्हाला दुर्मिळ वनस्पती आणि पक्षी पाहायला मिळू शकतात.
6 / 6
डोंगराळ भागात मान्सूनमध्ये जाणे टाळावे. त्यामुळे दून व्हॅलीला भेट देण्यासाठी मार्च ते जून आणि सप्टेंबर ते नोव्हेंबर हा काळ सर्वात उत्तम आहे. यावेळी हवामान आल्हाददायक असते आणि हिमालयाचे विहंगम दृश्य स्पष्टपणे दिसते. जर तुम्हाला यंदाच्या सुट्टीत काहीतरी वेगळं आणि शांत एक्सप्लोर करायचं असेल, तर या 'हिडन व्हॅली'चा प्लॅन नक्की करा!
टॅग्स :tourismपर्यटन