coronavirus: कोरोनाबाबत अजित पवारांच्या उपस्थितीत बोलावलेल्या बैठकीला पुण्यातील अर्ध्या आमदारांची दांडी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2021 02:23 PM2021-02-21T14:23:03+5:302021-02-21T14:25:02+5:30

coronavirus in Pune : पुणे जिल्ह्यातील कोरोना वाढीसंदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थिती मध्ये बैठक घेण्यात आली. मात्र या बैठकीला ५० टक्क्यांपेक्षाही कमी आमदारांनी हजेरी लावली.

coronavirus: Half of Pune MLAs Absent to meeting convened in the presence of Ajit Pawar on Coronavirus | coronavirus: कोरोनाबाबत अजित पवारांच्या उपस्थितीत बोलावलेल्या बैठकीला पुण्यातील अर्ध्या आमदारांची दांडी

coronavirus: कोरोनाबाबत अजित पवारांच्या उपस्थितीत बोलावलेल्या बैठकीला पुण्यातील अर्ध्या आमदारांची दांडी

Next

पुणे - पुणे जिल्ह्यातील कोरोना वाढीसंदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थिती मध्ये बैठक घेण्यात आली. मात्र या बैठकीला ५० टक्क्यांपेक्षाही कमी आमदारांनी हजेरी लावली. (coronavirus in Pune ) त्यामुळे शहराच्या आणि जिल्ह्याच्या या महत्वाच्या प्रश्नावर लोकप्रतिनिधीं गंभीर आहेत का असा सवाल आता विचारला जात आहे. (Half of Pune MLAs Absent to meeting convened in the presence of Ajit Pawar)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या आजच्या बैठकीत पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा आणि कॉलेज देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

मात्र महत्वाचे निर्णय घेण्यासाठी बोलावलेल्या या बैठकीला ३ खासदार तर २१ पैकी ८ आमदारांनी हजेरी लावली. खासदारांपैकी पुणे शहराचे राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण उपस्थित होते तर आमदारांपैकी दत्तात्रय भरणे, सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, राहुल कुल उपस्थित होते तर चेतन तुपे यांनी उशिरा बैठकीला हजेरी लावली.

दरम्यान या बैठकीमध्ये पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी १५ दिवसांसाठी शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात यावीत अशी मागणी केली. पण अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे नुकसान होईल म्हणत या मागणीला विरोध केला. अखेर २८ तारखेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला 

Web Title: coronavirus: Half of Pune MLAs Absent to meeting convened in the presence of Ajit Pawar on Coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.