Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 21:05 IST2026-04-19T21:03:53+5:302026-04-19T21:05:08+5:30

रितेश देशमुखच्या उपस्थितीत 'बिग बॉस मराठी ६' च्या ग्रँड फिनालेचं पहिलं एविक्शन पार पडलं. यात अभिनेत्री दिपाली सय्यद घराबाहेर पडली आहे.

deepali sayed evicted from bigg boss marathi 6 grand finale live updates | Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का

Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का

'बिग बॉस मराठी ६'च्या ग्रँड फिनालेला सुरुवात झाली आहे. राकेश बापट, विशाल कोटियान, अनुश्री माने, तन्वी कोलते आणि दिपाली सय्यद या टॉप ५ स्पर्धकांमध्ये 'बिग बॉस मराठी ६'ची ग्रँड फिनाले रंगणार आहे. रितेश देशमुखच्या उपस्थितीत 'बिग बॉस मराठी ६' च्या ग्रँड फिनालेचं पहिलं एविक्शन पार पडलं. यात अभिनेत्री दिपाली सय्यद घराबाहेर पडली आहे. ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच दिपालीच्या बाहेर पडण्यामुळे प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे.

दिपाली सय्यद सुरुवातीपासून शेवटच्या १०० दिवसांपर्यंत 'बिग बॉस मराठी ६' मधील एक स्ट्राँग स्पर्धक म्हणून ओळखली जात होती. दिपालीने तिच्या खेळाच्या आणि हुशारीच्या जोरावर 'बिग बॉस मराठी ६' मध्ये ग्रँड फिनालेपर्यंत बाजी मारली. समोर एकापेक्षा एक धुरंधर स्पर्धक असूनही दिपाली सय्यदने संपूर्ण सीझनभर तिचं अस्तित्व दाखवून दिलं. त्यामुळे दिपालीचं बाहेर जाणं सर्वांसाठी धक्कादायक होतं. 

दिपालीची घरात तन्वी कोलते आणि राकेश बापटसोबत चांगली मैत्री होती. दिपालीच्या बाहेर जाण्याने तन्वी आणि राकेशलाही चांगलाच धक्का बसला. दिपालीने आजवरच्या तिच्या खेळाबद्दल समाधान व्यक्त केलं. दिपालीचं कुटुंब तिच्या या खेळाबद्दल समाधानी आहेत. दिपाली बाहेर पडल्याने आता 'बिग बॉस मराठी ६' मध्ये टॉप ४ स्पर्धक उरले आहेत. आता या टॉप ४ पैकी कोण घराबाहेर जाणार आणि कोण 'बिग बॉस मराठी ६'च्या ट्रॉफीवर स्वतःचं नाव कोरणार, हे पाहणं कुतुहलाचा विषय आहे.

Web Title : बिग बॉस मराठी 6: ग्रैंड फिनाले की शुरुआत में चौंकाने वाला निष्कासन!

Web Summary : 'बिग बॉस मराठी 6' का ग्रैंड फिनाले दीपाली सय्यद के निष्कासन के साथ शुरू हुआ। एक मजबूत दावेदार, उनके जाने से दर्शक हैरान थे। राकेश बापट और तन्वी कोलते विशेष रूप से हैरान थे। ट्रॉफी के लिए चार प्रतियोगी बचे हैं।

Web Title : Bigg Boss Marathi 6: Shocking Eviction at Grand Finale Start!

Web Summary : The 'Bigg Boss Marathi 6' grand finale began with Deepali Sayyed's eviction. A strong contender throughout, her departure surprised viewers. Rakesh Bapat and Tanvi Kolte were particularly shocked. Four contestants remain vying for the trophy.