शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus :कोरोनामुळे सील केलेल्या भागात अत्यावश्यक सेवांचा पुरवठा सुरळीत सुरू ठेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 18:43 IST

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुणे शहरातील काही भाग प्रशासनाने सील करण्याचा घेतला निर्णय

ठळक मुद्देविभागीय आयुक्तांचे यंत्रणेला आदेश सील केलेल्या भागातील दूध, भाजीपाला, गॅस, औषधे यांचा पुरवठा सुरु राहील. परिसरातील स्वच्छता गृहे, गल्लीबोळ निजंर्तुकीकरण करण्यावर अधिक भर देण्यात येणार

पुणे : पुण्यात काही भागात कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढत असल्याने खबरदारी म्हणून प्रशासनाने मंगळवारी मध्यरात्री पासून कोरोना बाधित परिसर सील केला आहे. या भागात अत्यंत कडक संचारबंदी लागू आहे. परंतु यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सील केलेल्या भागात अत्यावश्यक सेवांचा पुरवठा सुरळीत सुरू ठेवण्याचे आदेश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी संबधित यत्रणेला दिले आहेत.कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुणे शहरातील काही भाग प्रशासनाने सील करण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर मंगळवार (दि.7) रोजी विभागीय आयुक्त यांनी उच्चस्तरीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत अंमलबजावणीबाबत आढावा घेतला.यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम्, पुणे महानगर पालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड, पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी - चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांची उपस्थिती होती.शहराच्या मध्यवर्ती भागात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने कोंढवा तसेच महर्षीनगर ते आर. टी. ओ. कार्यालयापर्यंतचा जुन्या पेठांचा भाग काल मध्यरात्रीपासून सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या भागात संचारबंदीची काटेकोर अंमलबजावणी होत आहे. सील केलेल्या भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या आधिक आहे. त्यामुळे परिसरातील अन्य नागरिकांनाही संसर्ग होण्याच्या शक्यतेने प्रशासन याबाबत अधिक सक्रिय झाले आहे. सील केलेल्या भागातील नागरिकांनी संचारबंदीचे आदेश पाळून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले. या सील केलेल्या भागातील दूध, भाजीपाला, गॅस, औषधे आदिंचा पुरवठा सुरु राहील. परिसरातील स्वच्छता गृहे, गल्लीबोळ निजंर्तुकीकरण करण्यावर अधिक भर देण्यात येणार आहे. डॉक्टर, अत्यावस्थ रुग्ण, अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींना यातून सूट मिळेल. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे, संभ्रमाचे वातावरण निर्माण होऊ नये, यासाठी स्वयंसेवी संस्था पोलीस विभागातर्फे समुपदेशन करुन प्रशासन आपल्या पाठीशी असल्याची भावना लोकांपर्यंत पोहचविणे आवश्यक आहे,अशा स्वरुपाच्या सूचना बैठकीत करण्यात आल्या.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPoliceपोलिस