पुणे : जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावर वारकऱ्यांच्या दिंडीत कंटेनर शिरून मोठा अपघात झाला. या अपघातात साधारण 10 लोक जखमी असून त्याच्यातील चार लोक गंभीर जखमी आहेत. तर एका महिलेचा कंटेनर खाली चिरडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही घटना मावळ तालुक्यातील कामशेत भागात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिकी एकादशी निमित्ताने उरण तालुक्याच्या बसावी गावातील वारकऱ्यांची दिंडी पंढपूरला चालली होती. त्यावेळी कामशेत येथे भैरवनाथ मंदिर रात्री ते मुक्कामाला थांबले. सकाळच्या सुमारास या दिंडीने प्रस्थान केले. त्यावेळी जुना पुणे मुंबई महामार्ग क्रॉस करताना पुण्याच्या दिशेने येणारा कंटेनर अतिशय वेगाने येऊन वारकऱ्यांच्या दिंडीत शिरला. यामध्ये मोठा अपघात झाला आहे. साधारण 10 लोक जखमी असून त्याच्यातील ४ लोक गंभीर जखमी आहेत. तर एका महिलेचा कंटेनर खाली चिरडून मृत्यू झालेला आहे. नागरिकांनी व वारकऱ्यांनी या ठिकाणी आंदोलन सुरु केले आहे. कामशेत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील या ठिकाणी उपस्थित असून त्यांनी वारंवार नागरिकांना व वारकऱ्यांना समजावून सांगत आहे की, आपल्याला जखमी झालेल्या नागरिकांना वारकऱ्यांना महावीर हॉस्पिटल येथे घेऊन जायचे आहे. पुढील उपचारासाठी तरी आपण यासाठी मार्ग द्यावा. परंतु वारकऱ्यांनी आक्रमक पवित्र घेतल्याचे दिसून येत आहे.
Web Summary : A container truck struck a Warkari procession on the old Pune-Mumbai highway near Kamshet, killing one woman and injuring ten others, four seriously. The pilgrims were en route to Pandharpur. Protests erupted at the scene.
Web Summary : पुराने पुणे-मुंबई राजमार्ग पर कामशेत के पास एक कंटेनर ट्रक ने वारकरी दिंडी को टक्कर मार दी, जिससे एक महिला की मौत हो गई और दस अन्य घायल हो गए, जिनमें से चार गंभीर हैं। तीर्थयात्री पंढरपुर जा रहे थे। घटनास्थल पर विरोध प्रदर्शन शुरू हो गया।