शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 06:42 IST

Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज मंगळवारी २० जिल्ह्यांतील १२२ मतदारसंघांत मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून, सुमारे ४ लाख सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहेत. ३.७ कोटी मतदार या मतदारसंघांतील १,३०२ उमेदवारांचे भवितव्य ठरवतील.

- एस. पी. सिन्हापाटणा  - बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज मंगळवारी २० जिल्ह्यांतील १२२ मतदारसंघांत मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून, सुमारे ४ लाख सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहेत. ३.७ कोटी मतदार या मतदारसंघांतील १,३०२ उमेदवारांचे भवितव्य ठरवतील.

या मतदानासाठी ४५,३९९ केंद्र उभारण्यात आली असून, यातील ४०,०७३ केंद्र ग्रामीण भागात आहेत. या भागात सुरक्षेच्या दृष्टीने ६० हजार राज्य पोलिस, राखीव दलाचे २ हजार जवान, विशेष सशस्त्र दलाचे ३० हजार जवान, २० हजार होमगार्ड आणि इतर प्रशिक्षणार्थी जवान सज्ज आहेत.

‘विरोधक संपून जातील’१४ नोव्हेंबरला निकाल जाहीर होण्यापूर्वी बिहार भाजपचे निवडणूक प्रभारी आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या निवडणुकीत विरोधी पक्ष संपून जाईल, असा दावा केला.  नितीशकुमार आणि मोदी सरकारने बिहारसाठी केलेल्या कामाची पावती जनता देणार असून बिहारच्या नशिबात खूप काही चांगले लिहिलेले असल्याचेही त्यांनी सांगितले. 

‘आयोगावर बाह्य नियंत्रण’ पाटणा : निवडणूक आयोग केंद्रीय नेत्यांच्या प्रभावाखाली कार्यरत असून आयोगावर ‘बाहेरच्या’ शक्तींचे नियंत्रण असल्याचा आरोप राजद नेते तेजस्वी यादव यांनी सोमवारी केला. आयोगाने विक्रमी मतदान करणाऱ्यांत महिला, पुरुष किती आहेत ही आकडेवारी जाहीर केली नसल्याचा आरोप त्यांनी केला.

यंदाच्या निवडणुकीची  वैशिष्ट्ये नेमकी काय?यंदा प्रथमच निवडणूक ड्यूटीवर असलेल्या सुरक्षा जवानांना एकाही मतदान केंद्रावर हेलिकॉप्टरने उतरवण्याची वेळ आली नाही. ग्रामीण भागातील सुधारलेले रस्ते आणि पायाभूत सुविधांमुळे रस्ते मार्गांचाच अधिक वापर झाला.माओवादी कारवायांत प्रचंड घट झाल्याने प्रथमच एखादे मतदान केंद्र इतरत्र हलवण्याची गरज पडली नाही. या पहिल्या टप्प्यात कुठे हिंसाचाराची एकही घटना घडली नाही. १२२ मतदारसंघांत पुरेसा पोलिस फौजफाटा तैनात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar Second Phase Polling Today: 20 Districts, 122 Seats

Web Summary : Bihar's second phase election sees voting in 122 seats across 20 districts. Over 3.7 crore voters will decide the fate of 1,302 candidates amid tight security. BJP predicts victory, while RJD alleges external control over the Election Commission. Improved infrastructure reduces reliance on helicopters.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५Votingमतदान