शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक

By यदू जोशी | Updated: November 11, 2025 08:51 IST

Local Body Election: भाजप आणि काँग्रेस या राज्यातील दोन प्रमुख राजकीय पक्षांनी नगराध्यक्षपदाचे उमेदवार निश्चित करण्यासाठीच्या हालचालींना वेग दिला आहे. या संदर्भात भाजपची बैठक मंगळवारी तर काँग्रेसची बैठक बुधवारी मुंबईत होणार आहे. दोन्हींचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार येत्या पाच दिवसांत जाहीर होतील.

- यदु जोशीमुंबई -  भाजप आणि काँग्रेस या राज्यातील दोन प्रमुख राजकीय पक्षांनी नगराध्यक्षपदाचे उमेदवार निश्चित करण्यासाठीच्या हालचालींना वेग दिला आहे. या संदर्भात भाजपची बैठक मंगळवारी तर काँग्रेसची बैठक बुधवारी मुंबईत होणार आहे. दोन्हींचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार येत्या पाच दिवसांत जाहीर होतील.

भाजपच्या निरीक्षकांनी प्रत्येक नगर परिषद, नगर पंचायतीत जाऊन स्थानिक पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली आणि प्रत्येक ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या तीन संभाव्य उमेदवारांची यादी तयार करून ती जिल्ह्याच्या प्रभारींकडे सोपविली आहे. मंगळवारच्या बैठकीत चर्चा होऊन बरीच नावे ठरतील असा अंदाज आहे.

भाजपच्या निरीक्षकांनी जी प्रत्येकी तीन नावे प्रभारींकडे दिली त्यापैकी कोण निवडून येण्याची अधिक शक्यता आहे याचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. याचे अहवालही मंगळवारच्या बैठकीत ठेवले जातील. तीन व्यतिरिक्त काही ठिकाणी सर्वेक्षणात चौथे नावही आले आहे, त्यावरही चर्चा होईल. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि ज्येष्ठ नेते उपस्थित राहतील. या बैठकीनंतर कोअर कमिटीची एक बैठक होऊन नावे अंतिम केली जातील असेही सूत्रांनी सांगितले. 

भाजपसोबत जायचे नाही; प्रदेश काँग्रेसमहाविकास आघाडी एकसंधपणे सर्व नगर परिषदांमध्ये लढणार नाही हे स्पष्ट झाले आहे. आम्ही स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. योग्य वाटेल तेथे ते मित्रपक्षांबरोबर जातील किंवा एकटे लढतील.  तथापि, कोणत्याही परिस्थितीत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांबरोबर उघड वा छुप्या पद्धतीनेही युती करायची नाही असे आम्ही बजावून सांगितले आहे, असे प्रदेश काँग्रेसच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले. 

काँग्रेसचे विभागीय प्रभारीस्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विभागीय प्रभारी नेमले आहेत. ते असे- नागपूर विभाग-विजय वडेट्टीवार, पश्चिम महाराष्ट्र-सतेज (बंटी) पाटील, उत्तर महाराष्ट्र-बाळासाहेब थोरात, अमरावती विभाग-यशोमती ठाकूर, मराठवाडा-अमित देशमुख, कोकण-नसीम खान. 

सर्वेक्षणांवर जोरभाजपने नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची नावे अंतिम करण्यासाठी सर्वेक्षणांचा सपाटा लावला आहे. नामवंत सर्वेक्षण संस्थांकडून हे काम करवून घेतले जात आहे. प्रदेश भाजप आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी वेगवेगळी सर्वेक्षणे केली असून एकत्रितपणे त्याचा सारांश काढला जाणार आहे. 

कॉंग्रेसचे निरीक्षक कळीचेकाँग्रेस पक्षाच्या प्रदेश निवड मंडळाची बैठक प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी होईल. प्रत्येक नगरपालिकेत पाठविलेल्या निरीक्षकांनी सुचविलेल्या नगराध्यक्षांच्या नावांवर तीत चर्चा होईल. भाजप आणि काँग्रेस या दोन्हींच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदाची नावे १५ नोव्हेंबर किंवा जास्तीतजास्त १६ नोव्हेंबरला जाहीर होतील. १७ नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज भरण्यासाठीची शेवटची तारीख आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : BJP, Congress to finalize mayoral candidates within five days.

Web Summary : BJP and Congress expedite mayoral candidate selections, meetings in Mumbai. BJP's meeting is today, Congress's tomorrow. Final lists expected within five days. Congress opposes BJP alliances.
टॅग्स :Local Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकMaharashtraमहाराष्ट्र