शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
2
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
4
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
5
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
6
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
7
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
8
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
9
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
10
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
11
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
12
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
13
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
14
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
15
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
16
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
17
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
18
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
19
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
20
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 09:37 IST

लाल किल्ल्याजवळील बॉम्बस्फोटात बस कंडक्टर अशोक कुमारचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Delhi Blast: सोमवारी संध्याकाळी ६:५२ वाजता राजधानी दिल्ली एका शक्तिशाली स्फोटाने हादरली. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की त्यामुळे जवळील वाहनांचा चुराडा झाला. या घटनेत आठ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण स्फोटात उत्तर प्रदेशातील चार जणांचाही मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशातील मृतांमध्ये अमरोहा जिल्ह्यातील अशोक कुमार नावाचा एक व्यक्ती आहे. अशोक दिल्लीत राहत होता आणि एका वाहतूक कंपनीत बस कंडक्टर म्हणून काम करत होता. त्याच्या मृत्यूची बातमी कळताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण बॉम्बस्फोटाने अनेक  कुटुंबांना कायमचे उद्ध्वस्त केले आहे. या भीषण स्फोटात मृत पावलेल्या आठ जणांपैकी एक असलेले अशोक कुमार (३४) हे उत्तर प्रदेशात अमरोहा जिल्ह्यातील हसनपूरच्या मंगरौला गावचे रहिवासी होते. अशोक कुमार नेहमीप्रमाणे आपली ड्युटी संपवून घरी परतत असताना भीषण स्फोटात त्यांचा मृत्यू झाला. मंगरौला गावात अशोक यांचे वडिलोपार्जित घर आहे. त्यांच्या वडिलांचे यापूर्वीच निधन झाले आहे. त्यामुळे वृद्ध आई आणि कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी अशोक यांच्या खांद्यावर होती. कुटुंबाने अजूनही त्यांच्या आईला अशोकच्या मृत्यूची बातमी दिलेली नाही. त्यांची प्रकृती नाजूक असल्याने हे सत्य लपवून ठेवण्यात आले आहे.

अशोक यांच्यामागे त्यांची पत्नी आणि तीन लहान मुले – दोन मुली आणि एक मुलगा – आहेत. दिल्लीत भाड्याच्या घरात राहणाऱ्या या कुटुंबाचा संपूर्ण खर्च अशोक यांच्या नोकरीवर अवलंबून होता. अशोक खूप कष्टाळू होता. ड्युटी संपल्यावर ते रोज कुटुंबासाठी काहीतरी सामान घेऊनच घरी परतत असत. हा अपघात होण्याच्या काही तास आधी, अशोक यांचा घरी फोन आला होता. त्यांनी कुटुंबाला सांगितले होते की, "मी  थोड्याच वेळात घरी पोहोचत आहे. मुलांसाठी बिस्किटे आणि दूध घेतले आहे." हा फोन ठेवून काही वेळातच टीव्हीवर दिल्लीत स्फोट झाल्याची बातमी आली.

दिल्ली स्फोटामध्ये अमरोहा येथील व्यक्तीचा मृत्यू झाल्याची बातमी टीव्हीवर आल्यानंतर काही वेळातच पोलीस मंगरौला गावात पोहोचले. अशोकचे चुलत भाऊ सोमपाल शर्मा यांनी सांगितले की, पोलिसांनी टीव्हीवरील बातमी आणि मृतांची ओळख पटवल्यानंतर गावात येऊन चौकशी केली. पोलिसांनी अशोकच्या दिल्लीतील राहण्याच्या ठिकाणाची, नोकरीची आणि त्यांच्या मित्रांची माहिती घेतली. स्फोटाच्या दिवशी अशोक कोणत्या मार्गाने आणि कशा प्रकारे त्या ठिकाणी पोहोचले, याचीही पोलीस तपास करत आहेत. अशोकच्या भावाने दिल्लीकडे धाव घेतली आहे. दिल्लीत पोस्टमॉर्टम झाल्यानंतर अशोकचे पार्थिव गावात आणण्याची तयारी सुरू आहे.

दरम्यान, अशोक जोपर्यंत हात-पाय चालतात, तोपर्यंत मी सगळ्यांना सांभाळून घेईन, असे वारंवार म्हणायचा. पण अशोकच मृत्यूमुखी पडल्याने दोन कुटुंबांचा आधारस्तंभ हरपला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Delhi Blast Claims Bus Conductor; Family Unaware of Tragedy

Web Summary : A Delhi blast killed bus conductor Ashok Kumar from Uttar Pradesh. He was the sole provider for his family, including his elderly mother who remains unaware of his death. He leaves behind a wife and three children.
टॅग्स :delhiदिल्लीBlastस्फोटUttar Pradeshउत्तर प्रदेश